News

षक वातावरण असल्यामुळे यंदा राज्यात वेळेत तसेच चांगला पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्याने लावला होता.असं असलं तरी पाऊस लांबणीवर गेल्याचं चित्र दिसत आहे. मात्र काही भागात उशिरा का होईना पावसाला सुरुवात झाली आहे. राज्यात मुंबई, ठाणे, नवी मुंबई या परिसरांत पावसाने दडी मारली आहे.

Updated on 26 June, 2022 4:58 PM IST

रखरखत्या उन्हाचा तडाखा सोसल्यानंतर आता सर्वचजण पावसाची वाट बघत आहेत. मात्र जून महिना उजाडला तरी राज्यात काही भागात ऊनच आहे. पोषक वातावरण असल्यामुळे यंदा राज्यात वेळेत तसेच चांगला पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्याने लावला होता.असं असलं तरी पाऊस लांबणीवर गेल्याचं चित्र दिसत आहे. मात्र काही भागात उशिरा का होईना पावसाला सुरुवात झाली आहे.

राज्यात मुंबई, ठाणे, नवी मुंबई या परिसरांत पावसाने दडी मारली आहे. मात्र राज्यातील अनेक भागात मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे हवामान खात्याने राज्यासाठी पुढील ५ दिवस मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. रत्नागिरी जिल्ह्यांत तर पुढील ३-४ तासात काही ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली गेली आहे.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, पुढील ३ ते ४ तासांत सिंधुदुर्ग, ठाणे, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यातील काही ठिकाणी माध्यम ते जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या जिल्ह्यांना सतर्क राहण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. त्यामुळे नागरिकांनी हवामानाचा अंदाज घेत घराबाहेर पडावे अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत.

हवामान खात्याने दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, कोकण, मराठवाडा, विदर्भासाठी 'येलो अलर्ट' दिला आहे तर मध्य महाराष्ट्रातही विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान खात्याच्या माहितीनुसार पुढील पाच दिवस पाऊस राहणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आणि नागरिकांनी पावसाचा अंदाज घेत घराबाहेर पडण्याच्या सूचना दिल्या गेल्या आहेत.

137.28 लाख टन, साखर उत्पादनात महाराष्ट्र अव्वल स्थानी

तसेच ठाणे, पालघर, मुंबई, रायगड, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ या भागांना 'यलो अलर्ट' देण्यात आला आहे. मराठवाड्यामधील औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद, लातूर, परभणी, नांदेड, हिंगोली इथे सध्या जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. पावसाचा जोर अधिक वाढण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तविण्यात आली आहे.

महत्वाच्या बातम्या:
'मधमाशी मित्र' तयार करण्याचा राज्यातील पहिलाच उपक्रम; रोजगारही होणार उपलब्ध
आता 'ई-चावडी' उपक्रम ठरणार शेतकऱ्यांसाठी वरदान; राज्य सरकारचा मोठा निर्णय

English Summary: Farmers take care; 'Yellow alert' issued to these districts, next 5 days important
Published on: 26 June 2022, 04:58 IST