देशात सर्वत्र कांदा लागवड थोड्या मोठ्या प्रमाणात केली जाते. महाराष्ट्र राज्य प्रमुख कांदा उत्पादक राज्यांच्या (Major onion grower State) यादीत समाविष्ट आहे. राज्यातील पश्चिम महाराष्ट्रात, मराठवाड्यात, विदर्भात तसेच कोकणात देखील कांदा लागवड केली जाते. नाशिक जिल्ह्याला विक्रमी कांद्याचे उत्पादन घेतले जात असल्याने कांद्याचे आगार (Onion depot) म्हणून संबोधले जाते.
सध्या नाशिक जिल्ह्यासमवेतच पश्चिम महाराष्ट्रातील (Maharashtra) अनेक भागात खरीप हंगामातील (In the kharif season) लाल कांदा काढणी अंतिम टप्प्यात येत आहे. तसेच आगामी काही दिवसात लेट खरीप मध्ये लावण्यात आलेला रांगडा कांदा काढणीसाठी तयार होणार आहेत. मात्र अनेकदा कांदा उत्पादक शेतकरी कांदा काढणी करताना मोठी चूक करतात त्यामुळे कांद्याच्या दर्जावर तसेच उत्पादन खर्चात वाढ होते. आज आपण कांदा काढणी (Onion harvesting) करताना व काढणी करण्यापूर्वी कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी कोणत्या गोष्टींची विशेष काळजी घेतली पाहिजे याविषयी जाणून घेणार आहोत. नाशिक जिल्ह्यातील कळवण, सटाणा, मालेगाव, देवळा म्हणजेच कसमादे पट्टा किंवा मोसम खोरे व जिल्ह्यातील चांदवड, येवला या तालुक्यात मोठ्या प्रमाणात लेट खरीप हंगामातील रांगडा कांदा लागवड केला गेला आहे. आगामी काही दिवसात परिसरातील रांगडा कांदा काढणी साठी सज्ज होणार आहे त्या अनुषंगाने कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी काही महत्वाच्या बाबी जाणुन घेणे महत्वाचे ठरणार आहे.
कांदा काढणी करताना व काढणीपूर्वी या गोष्टींची घ्या काळजी
•कांदा काढणीला येईल त्याच्या साधारणता पंधरा दिवस अगोदर कांदा पिकाला पाणी भरणे बंद केले पाहिजे.
•कांदा काढणी जेव्हा कांद्याची पात 50% मान टेकते त्यावेळीच करण्याचा सल्ला कृषी तज्ज्ञांकडून देण्यात येतो.
•ज्या कांद्याला डेंगळे आले असतील तो कांदा चांगल्या कांद्यातून वेगळा काढणे गरजेचे असते.
•कांद्याची पात जास्त वाळू न देता आंबट ओली असतानाच कांद्याची काढणी करावी. जर कांद्याची पात जास्त वाळली तर उपटताना कांद्याची पात तुटून जाते व कांदा उपटण्यासाठी जमत नाही अशावेळी कांदा खूरप्याने किंवा कुदळीने खोदून काढावा लागतो यामुळे वेळ वाया जातो शिवाय मजुरी देखील अधिक लागते परिणामी उत्पादन खर्चात वाढ होते.
•कांदा काढणी केल्यानंतर पाती समवेतच कांदा दोन तीन दिवस शेतात सुकण्यास पडू द्यावा. मात्र कांदा ठेवताना अशा पद्धतीने ठेवावा की त्याची फक्त पाच झाकले जाईल आणि कांदा हा उघडा राहील.
•कांदा संपूर्ण सुकल्यानंतर कांद्याची खांडणी करावी, कांद्याचे खांडणी करताना कांद्याला दोन ते अडीच सेंटीमीटर मान ठेवून करावी.
•कांदा खांडणी झाल्यानंतर कांद्याची सॉर्टिंग करावी, चांगल्या कांद्यातून बेले कांदे, गोल्टी कांदे, डेंगळे आलेले कांदे वेगळे ठेवावे. चांगले कांदे कमीत कमी बारा दिवस सावलीत तसेच पडून राहू द्यावे. असे असले तरीपावसाळी लाल कांदा मात्र खांडणी केल्यानंतर दोन तीन दिवसात किंवा लागलीच विक्रीसाठी न्यावा. मात्र रांगडा आणि उन्हाळी कांदा दहा-बारा दिवस वाळवण्यासाठी तसाच पडून राहू द्यावा.
•कांदा वाळवण्यासाठी ठेवल्यास कांद्याच्या पृष्ठभागावर चा पापुद्रा कांद्याला घट्ट चिकटतो तसेच कांद्याची मान सुकून जाते. कांद्याची मान चांगली सुकली असल्यास त्यातून रोगजंतूंचा प्रवेश होत नाही आणि परिणामी कांदा सडत नाही.
Published on: 01 February 2022, 08:51 IST