News

मुंबई: विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा (Monsoon session) आज चौथा दिवस आहे. अधिवेशनाचे तीन दिवस विरोधकांच्या आंदोलनाने आणि घोषणाबाजीने चांगलेच गाजले. पण आज विधानभवनाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर शेतकऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न केला.

Updated on 23 August, 2022 1:13 PM IST

मुंबई: विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा (Monsoon session) आज चौथा दिवस आहे. अधिवेशनाचे तीन दिवस विरोधकांच्या आंदोलनाने आणि घोषणाबाजीने चांगलेच गाजले. पण आज विधानभवनाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर शेतकऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न केला.

शेतकऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न

साताऱ्यातील कांदळगावचे शेतकरी सुभाष भानुदास देशमुख (Subhash Bhanudas Deshmukh) यांनी आज विधिमंडळ परिसरात आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. सुभाष देशमुख यांनी विधान भवनाबाहेर (Vidhan Bhawan) रॉकेल अंगावर टाकत स्वत:ला पेटवून घेतलं.

Green Manure: पिकांना युरिया खताची गरज भासणार नाही; आता घरीच शेतात बनवा हिरवळीचे खत

घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. आग विझवत देशमुख यांना जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. शेतीच्या वादातून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची प्राथमिक माहिती आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पुढील तपास पोलिस करत आहेत.

काय सांगता! आता हवेतही घेता येणार बटाट्याचे उत्पादन; एरोपोनिक तंत्रज्ञानाची कमाल

English Summary: Farmer's suicide attempt in Vidhan Bhawan
Published on: 23 August 2022, 01:13 IST