शेतकऱ्यांचा हक्काचा जोडधंदा म्हणजे दुग्ध व्यवसाय. प्रत्येक शेतकऱ्याकडे एक का होईना गाई असतेच तर अनेक शेतकऱ्यांचे मोठे गोठ आहेत. अनेकांचा तो प्रमुख व्यवसाय देखील आहे. शेतकऱ्यांना यामधूनच चार पैसे मिळत असतात. असे असताना यामध्ये अनेक अडचणी देखील येतात. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असते. याबाबत अनेक शेतकऱ्यांना माहिती नसते. यामुळे अनेक जनावरे दगावतात. सध्या जनावरांच्या पोटफुगीमुळे शेतकरी त्रस्त आहेत. यावर काही महत्वाच्या उपाययोजना आहेत. ज्याद्वारे शेतकरी जनावरांची काळजी घेऊ शकतो.
पोटफुगी हा सगळ्या शेतकऱ्यांनी आपल्या जनावरांबाबत अनुभवलेला रोग आहे. जनावरांच्या खाद्यामधील झालेल्या बदलामुळे तसेच इतर कारणामुळे जनावरांच्या पोटातील अन्नावर किण्वनाची प्रकिया जास्त प्रमाणात वाढते. त्यामुळे पोटात वायू जास्त प्रमाणात तयार होतो. हा वायू नैसर्गिकरित्या बाहेर टाकला जाऊ शकत नाही. या वाढलेल्या वायूचा ताण पोटाच्या पिशव्यांवर होतो, आणि यामुळे पोटफुगी होते. याबाबत लवकरात लवकर उपचार केले नाहीत तर हा धोका वाढू शकतो.
अनेकदा जनावरांच्या खाद्यातून काही वस्तू यामध्ये खिळा, लाकूड, पत्रा, प्लास्टिक हे पोटात गेले की पोट फुगीचा त्रास होतो. पोटफुगी झाल्यानंतर काही दिवस ते जनावर चारा खात नाही. याकाळात त्या जनावरांना कोवळी ज्वारी, बाजरी व वाटाणा, मक्याची हिरवी घाटे यासारखा चारा देऊ नये. यामुळे त्यांना अधिकच त्रास होईल. तसेच त्यांच्या तोंडात कडुलिंबाची एक काडी द्यावी. यामुळे पोटफुगी काहीशी कमी होईल. तसेच डॉक्टरांचा सल्ला याकाळात घ्यावा. तसेच जास्त जड चारा देऊ नये.
तसेच या काळात जनावरे बांधताना पुढचे पाय उंचावर व मागचे पाय उतारावर असतील. यामुळे फुगलेल्या अन्नाचा पिशवीचा दाब फुफ्फुसावर पडणार नाही. पोट फुगल्यावर जनावराच्या डाव्या भकाळीवर हाताने मालिश केल्यास जनावरांना आराम वाटतो. पोटफुगीची समस्या ही सतत येत असते. यामुळे याबाबत काळजी घेणे गरजेचे आहे. तसेच जनावरांना चारा देत असतानाच त्यामधून त्यांच्या पोटात काय जाणार नाही याबाबतची काळजी घेणे गरजेचे आहे. याबाबत काळजी न घेतल्यास अनेक जनावरे दगावली देखील आहेत.
Published on: 12 January 2022, 06:11 IST