News

तणनाशकांचा वापर करताना शेतकऱ्यांनी अनुभवातून काही गोष्टी शिकणे गरजेचे आहे. तण विज्ञान शास्त्र विषयाच्या माध्यमातून तणविषयक संशोधन चालू असते. पूर्वी तणनियंत्रण केले जात होते. आता परदेशात फक्त २ टक्के लोक शेती करतात. त्यांच्या शेतीचे क्षेत्र प्रचंड मोठे आहे.

Updated on 07 April, 2023 9:17 AM IST

तणनाशकांचा वापर करताना शेतकऱ्यांनी अनुभवातून काही गोष्टी शिकणे गरजेचे आहे. तण विज्ञान शास्त्र विषयाच्या माध्यमातून तणविषयक संशोधन चालू असते. पूर्वी तणनियंत्रण केले जात होते. आता परदेशात फक्त २ टक्के लोक शेती करतात. त्यांच्या शेतीचे क्षेत्र प्रचंड मोठे आहे.

ग्लायफोसेट तणावर फवारल्यानंतर प्रामुख्याने त्याचे पानातून शोषण होते. त्यातही पूर्ण वाढ झालेल्या पानातून जास्त शोषण होते. तेथून पानात तयार झालेली अन्नद्रव्य इतरत्र पसरण्याच्या प्रक्रियेतून सर्व वनस्पतीत तणनाशक पसरते. ते मूळ आणि त्यातही कंद असल्यास त्यात जास्त प्रमाणात साठवले जाते. दमट हवा व सामान्य तापमानात यांचे शोषण जास्त चांगल्या प्रकारे होते. मुळे, खोड, पाने, या क्रमाने वनस्पतीची वाढ खुंटते आणि ती मरते.

ग्लायफोसेट शोषणानंतर त्याचे अमिनो मिथाईल फॉस्फोनिक आम्ल या स्वरूपात वनस्पतीमध्ये भिनते. संशोधन असे सांगते, की पीक उत्पादनात (फळे अगर धान्ये, कडधान्ये) वनस्पतीचा इतर भागांच्या तुलनेत याचे अंश अत्यल्प राहतात. या आम्लाचे पुढे विघटन होऊन कर्ब वायू अधिक पाणी या स्वरूपात त्याचे अंश संपून जातात.

शेतकर्‍यांना 'हे' सरकार देणार बिनव्याजी कर्ज, जुने कर्ज फेडले की मिळणार ५% अनुदान

ग्लायफोसेटचे विघटन होऊन कर्बवायू आणि पाणी होते. ही क्रिया प्रामुख्याने सूक्ष्मजीवांकडून पार पाडली जाते. जमिनीचा सामू, आर्द्रता, तापमान, विघटन होऊ शकणारे पदार्थ आणि सूक्ष्मजीवांच्या अन्नाच्या उपलब्धतेचा ग्लायफोसेटच्या विघटनावर परिणाम होतो. या ठिकाणी विघटन होऊ शकणारे पदार्थ याचा अर्थ कुजलेले खत नव्हे. कुजणारा पदार्थ असा आहे.

सूर्यप्रकाशामुळे ग्लायफोसेटचे विघटन फारसे होत नाही, असे निष्कर्ष असले तरीही या तत्त्वाचा परिणाम समशीतोष्ण व शीत कटिबंधात जास्त होतो. त्या मानाने उष्णकटिबंधात सूर्यप्रकाशामुळे विघटनाचा वेग तुलनात्मक जास्त असतो. हे आपल्यासाठी महत्त्वाचे आहे.

सततचा पाऊस आता नैसर्गिक आपत्ती म्हणून घोषित, शेतकऱ्यांना होणार फायदा..

ग्लायफोसेटचे रासायनिक विघटन होऊन कर्बवायू, अमोनिया, फॉस्फरिक पाणी असे पदार्थ तयार होतात, ज्या जमिनीत रसायनांचे स्थिरीकरण व विजातीय विद्युत भारामुळे चिकटून राहण्याचे प्रमाण जास्त असते तेथे विघटनाचा वेग कमी राहतो. कमी सामू व सेंद्रिय कर्ब भरपूर असणाऱ्या जमिनीत वरील कारणाने विघटनाचा वेग कमी राहतो. जमिनीत असणाऱ्या सोडिअम व कॅल्शिअमचाही विघटनावर परिणाम होतो.

दुधाचे दर वाढण्याची शक्यता! भारतात दुधाची टंचाई, 12 वर्षानंतर दुधाची आयात होणार..
सर्वात जास्त दूध देणारी म्हैस तयार करणारे तंत्रज्ञान शास्त्रज्ञांनी शोधून काढले, शेतकऱ्यांना होणार फायदा..
शेतकर्‍यांना 'हे' सरकार देणार बिनव्याजी कर्ज, जुने कर्ज फेडले की मिळणार ५% अनुदान

English Summary: Farmers study herbicides
Published on: 07 April 2023, 09:17 IST