विदर्भ आणि मराठवाड्यात (Vidarbha and Marathwada) मोठ्या प्रमाणात खरीप पिकांचे (Kharip Crop) मान्सूनच्या पावसामुळे नुकसान झाले आहे. सोयाबीन आणि कपाशीचे नुकसान झाल्यामुळे उत्पादनात घट (Decrease in production) होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पावसाने (rain) उघडीप दिल्याने आता शेतकऱ्यांची पिके वाचवण्याची धडपड सुरु झाली आहे.
नांदेड (Nanded) जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे सोयाबीन, उडीद, मूग, कापूस, केळी या पिकांना मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. शेतकऱ्यांकडून सरकारकडे नुकसान भरपाईची मागणी करण्ह्यात येत आहे. खरीप पीक पूर्णपणे उद्धवस्त झाल्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी चांगलाच अडचणीत सापडला आहे.
जिल्ह्यातील 8 लाख हेक्टरवरील पिकांचे 80 टक्के नुकसान झाले आहे. तर आता गेल्या 25 दिवसापासून नांदेड जिल्ह्यात पावसाने उघडीप दिल्यानं उर्वरित 20 टक्के पिकेही वाळून जात असल्यानं, शेतकऱ्यांचे यावर्षी 100 टक्के नुकसान झालं आहे.
खरीप हंगामामध्ये नांदेड जिल्ह्यात 4 लाख 50 हजार हेक्टर एवढा सोयाबीन पिकाची पेरणी झाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे यातील 3 लाख 50 हजार हेक्टर वरील सोयाबीन (soybean) मुसळधार पावसामुळे नष्ट झाले आहे.
तसेच काही भागात सुरुवातीला मुसळधार पाऊस झाला त्यानंतर शेतकऱ्यांनी खरीप पिकांची पेरणी केली मात्र गेल्या २५ दिवसांपासून पाऊस गायब असल्यामुळे पिके सुकायला लागली आहे. हीच पिके वाचवण्यासाठी टँकरने तसेच तुषार सिंचनने पाणी देण्याची धडपड शेतकऱ्यांची चालली आहे.
कापसाला मिळणार उच्चांकी भाव! कापूस निघण्यापूर्वीच व्यापारी शेतकऱ्यांच्या दारात
नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टीमुळं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसह बाधित क्षेत्रात भर पडून एकूण 7 लाख 41 हजार शेतकऱ्यांचे 5 लाख 27 हजार हेक्टर मधील खरीपासह बागायती आणि फळ पिकांचे 33 टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाल्याचा सुधारित अहवाल शासनाकडे पाठवला आहे.
यात बाधितांना एनडीआरएफच्या नव्या निकषनुसार (दुप्पट भरपाई ) भरपाईसाठी जिल्हा प्रशासनाने 717 कोटी 88 लाख 91 हजार 600 रुपयाची मागणी शासनाकडे केली आहे.
महत्वाच्या बातम्या:
BEL Recruitment 2022: बेलमधील अभियांत्रिकी सहाय्यकांसह विविध पदांसाठी भरती; जाणून घ्या तपशील...
EPFO: पीएफचे पैसे जमा झाले नाहीत? टेन्शन घेऊ नका, अशी करा सोप्या मार्गाने तक्रार...
Published on: 07 September 2022, 03:49 IST