News

सध्या शेतकऱ्यांवर वाईट दिवस आले आहेत. अनेक शेतकरी हे अवकाळी पावसामुळे मेटाकुटीला आले आहेत. असे असताना अनेक शेतकरी हे सरकारच्या मदतीपासून वंचीत राहत आहेत. यामध्ये सेनगाव तालुक्यातील चार मंडळ अतिवृष्टिग्रस्त यादीतून वगळल्यामुळे गेल्या आठ दिवसांपासून गोरेगाव व परिसरातील शेतकरी आंदोलने करीत संपावर गेले आहेत.

Updated on 24 September, 2022 2:09 PM IST

सध्या शेतकऱ्यांवर वाईट दिवस आले आहेत. अनेक शेतकरी हे अवकाळी पावसामुळे मेटाकुटीला आले आहेत. असे असताना अनेक शेतकरी हे सरकारच्या मदतीपासून वंचीत राहत आहेत. यामध्ये सेनगाव तालुक्यातील चार मंडळ अतिवृष्टिग्रस्त यादीतून वगळल्यामुळे गेल्या आठ दिवसांपासून गोरेगाव व परिसरातील शेतकरी आंदोलने करीत संपावर गेले आहेत.

येथील शेतकरी संपाच्या आठव्या दिवशी अनेक गावांतील शेतकऱ्यांनी विविध ठिकाणी आंदोलन करत प्रशासनाच्या विरोधात घोषणा देत निषेध केला. आजच्या ८ व्या दिवशी गोरेगाव येथील शेतकऱ्यांनी चौफुली रस्त्यावर कांदे, बटाटे, टमाटे, भाजीपाला फेकून देत शासन विरोधात घोषणा दिल्या. यामुळे हे शेतकरी आता आक्रमक झाल्याचे दिसून येत आहेत.

कनेरगाव - सेनगाव रस्त्यावरील हाताळा आणि सुरजखेडा फाट्यावर शेतकऱ्यांनी टायर जाळून आंदोलन केले. यावेळी मोठ्या प्रमाणावर शेतकरी उपस्थित होते. या शेतकऱ्यांना मदतीपासून लांब ठेवले गेले आहे. वरखेडा येथील शेतकऱ्यांनी, ग्रामस्थांनी दिंडी काढून शासनाचा निषेध केला. यामुळे आता सरकारने लवकरात लवकर निर्णय घ्यावा, अशी मागणी शेतकरी करत आहेत.

शेतकऱ्यांना कृषी मंत्रालयाकडून ट्रॅक्टर, कुलींग व्हॅन, अर्थमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

यावेळी बालाजी महाराज शिंदे वरखेडकर, गजानन कावरखे, नामदेव पतंगे, गजानन सावके, राधेश्याम कावरखे, गजानन सावंत यांच्यासह शेकडो शेतकरी सहभागी झाले होते. दरम्यान, हिंगोली जिल्ह्याला देखील या अतिवृष्टीचा मोठा फटका बसला आहे. हिंगोली जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला होता. यामध्ये शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. सरकारने नुकसानग्रस्त भागातील शेतकऱ्यांना मदत देण्याचे जाहीर केले होते.

कौतुकास्पद! साखर कारखान्याकडून मोठी घोषणा, शेतकऱ्यांच्या मुलीच्या लग्नाला एक क्विंटल साखर देणार फुकट

असे असताना मात्र हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील तीन मंडळांना मदत मिळणार नाही. सेनगाव तालुक्यातील तीन मंडळांना मदतीपासून वंचित रहावे लागत आहे. या भागामध्ये अतिवृष्टी झाली नसल्याने पिकांचे नुकसान झाले नसल्याचा अजब दावा प्रशासनाने केला आहे. यामुळे शेतकरी आक्रमक झाले आहेत. यामुळे येथील शेतकरी संपावर गेले आहेत.

महत्वाच्या बातम्या;
Lumpy: दूध तुटवडा असल्याची अफवा पसरवल्यास कारवाई होणार, दर वाढण्याची शक्यता..
या 3 स्वस्त इलेक्ट्रिक कार्स लवकरच भारतात लॉन्च होणार, बजेट कमी असले तरी टेन्शन नाही...
पीक विम्याची 75 टक्के रक्कम वाटपास सुरू, शेतकऱ्यांना मोठा दिलासा

English Summary: Farmers' strike raged, farmers threw onions and potatoes on the streets
Published on: 24 September 2022, 02:09 IST