Pune News
पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील पिके पाण्याअभावी हातून जाण्याच्या मार्गावर आहेत. पावसाने दडी दिल्यामुळे आणि पीक वाढण्यासाठी ओलावा नसल्यामुळे तालुक्यातील ९० टक्के पीके सुकण्यास सुरुवात झाली आहे.
तालुक्यात ७१ टक्के पेरणीची झाल्याची स्थिती आहे. पण पाण्याअभावी पेरणी केलेली पिकेही आता सुकण्याच्या मार्गावर आहेत. तालुक्यात एकूण खरीप सरासरी क्षेत्र १९,२१९.३५ हेक्टर आहे. तुलनेने तालुक्यात पेरणी झालेले क्षेत्र १३,७१९.२५ हेक्टर आहे.
यंदा ऊस क्षेत्रात जवळपास ३० टक्के घट झाली आहे. तालुक्यात ऊसाचे सरासरी क्षेत्र २,६२२.६० हेक्टरवर पोहोचले आहे. मात्र पावसाअभावी सध्या १,८१२.९० हेक्टर क्षेत्रातच म्हणजे ६९.१३ टक्के क्षेत्रावरच ऊस आहे.
दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशातील अनेक जिल्ह्यांना उष्णतेपासून दिलासा मिळणार आहे. कारण राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये आज यलो आणि ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळं आज राज्यात जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे.
Published on: 23 August 2023, 11:12 IST