सध्या राज्यात महावितरण आणि शेतकरी यांच्या मोठा वाद सुरु आहे. शेतकऱ्यांनी अनेक ठिकाणी आंदोलने केली तर अनेकदा महावितरणचे कार्यालय देखील जाळले. अनेक ठिकाणी कार्यालयाला कुलूप देखील लावले. असे असताना आता (Agricultural Policy) कृषी धोरण 2020 या योजनेत शेतकऱ्यांचा सहभाग वाढवण्यासाठी महावितरणच प्रयत्न करीत आहे. या योजनेत सहभागी होण्यासाठी आता फक्त १० दिवस उरले आहेत.
शेतकऱ्यांना सहभागी होण्यासाठी 31 मार्च ही डेडलाईन ठरविण्यात आली आहे. यामुळे आता शेतकऱ्यांना यामध्ये सहभागी होण्याचे आवाहन करण्यात येत आहे. अनेक ठिकाणी वेगवेगळे उपक्रम राबवले जात आहेत. असे असताना या योजनेत सहभाग घेतला तर शेतकऱ्यांचा फायदा होणार आहे. या योजनेत सहभागी होण्यासाठी कर्मचाऱ्याचे प्रयत्न सुरु आहेत.
निफाड तालुक्यातील पिंपळगाव बसवंत उपविभागातील खेडेगाव, वरखेडा,चिंचखेड,पालखेड ,शिरवाडे वणी, कोकणगाव, साकोरा अशा 38 गावांमधून 70 ते 80 महावितरण अधिकारी कर्मचारी यांनी मोटारसायकल रॅली काढून ग्राहकांचे प्रबोधन केले आहे. योजनेत शेतकऱ्यांचा सहभाग वाढण्यासाठी सर्वकाही केले जात आहे. यामुळे आता तरी शेतकरी बिल भरणार का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. या योजनेत सुधारित थकबाकीवर 50 टक्के माफी देऊन उर्वरीत 50 टक्के वसुल करुन थकबाकीमुक्त करण्याचे धोरण आहे.
शिवाय वसुल झालेल्या रकमेपैकी 66 टक्के ही ‘कृषी आकस्मिक निधीतून’ वीज यंत्रणेतील विकास कामांवर खर्च केला जाणार आहे. यामुळे शेतकऱ्यांच्याच फायदा आहे. यामध्ये शेतकऱ्यांनी 50 टक्के रक्कम भरून त्या रकमेचा वापर हा शेतकऱ्यांना सुरळीत विद्युत पुरवठा करण्यासाठी होणार आहे. मात्र यामध्ये हवा तेवढा सहभाग अजूनही दिसत नाही. यामुळे महावितरणचे कर्मचारी प्रयत्न करत आहेत.
गावोगावी जाऊन महावितरणचे अधिकारी हे योजनेची माहिती देत आहेत. कर्मचारी हे योजनेत शेतकऱ्यांचा लाभ कसा हे पटवून दिले जात आहे. निफाड तालुक्यात सध्या महावितरणचे कर्मचारी हे मोटारसायकलहून रॅली काढत जनजागृती करीत आहे. यामुळे शेतकऱ्यांनाही योजनेचे स्वरुप लक्षात येत आहे. यामुळे याचा फायदा करून घेण्याचे आवाहन केले जात आहे.
महत्वाच्या बातम्या;
'साखर बनवली तर यावर्षी चांगल मार्केट मिळेल पण पुढील वर्षी फार बेकारी होईल, म्हणून..., गडकरींचे मोठे वक्तव्य
वसुली सुरु आहे म्हणून शेतकऱ्यांनी लढवली शक्कल, आता मोदी सरकार कशी करणार वसुली, वाचा..
22 मार्च रोजी 'जागतिक जल दिन 2022' निमित्त कृषी जागरणने वेबिनारचे आयोजन, जाणून घ्या काय असेल खास..
Published on: 21 March 2022, 10:21 IST