1. बातम्या

शेतकऱ्यांनो कमी पैशात सुरु करा 'या' फुलांचा व्यवसाय, मिळतील लाखो रुपये, जाणून घ्या..

भारतात अनेक सण उत्सव आणि वेगवेगळे कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर साजरे केले जातात. दररोज अनेक कार्यक्रमात फुलांना मोठी मागणी असते. यामुळे भारतात वेगवेगळ्या फुलांना मोठी मागणी असते. काही ठराविक फुलांना मोठी मागणी असते. मात्र त्याचे उत्पादन म्हणावे असे होत नाही. यामुळे या फुलांचे दर नेहेमीच जास्त असतात. असे असताना मात्र कमी पैशात सुरु होणार हा व्यवसाय अनेकजण करत नाहीत. मात्र अगदी कमी पैशांमध्ये आपण यामधून लाखो रुपये कमवू शकतो. यामुळे यामध्ये पैसे कमवण्याची चांगली संधी आहे.

निंबाळकर ओंकार रमेश

अनेकजण कमी पैशांत व्यवसाय सुरु करण्याचा विचार करत असाल तर त्यांच्यासाठी कंद फुलांच्या लागवडीचा एक चांगला पर्याय आपल्याकडे आहे. यामधून आपण मोठ्या प्रमाणावर पैसे कमवू शकतो. भारतात सुमारे 20 हजार हेक्टर क्षेत्रात कंद फुलांची लागवड केली जाते. मोठ्या प्रमाणावर लागवड करून देखील या फुलांना मोठी मागणी असते. या फुलांची लागवड करताना सुरुवातीला जमिनीची चांगली मशागत करावी. तसेच शेणखत वापरल्यास फुलांची वाढ देखील मोठ्या प्रमाणावर होते. यामुळे बाजारात या मोठ्या फुलांना मोठी मागणी राहते. बटाट्याच्या लागवडीप्रमाणे याची लागवड केली जाते. याचे चांगले कंद लावावे. 

कंद फुलांच्या लागवडीपासून तीन वर्षांपर्यंत याचे उत्पादन आपण घेऊ शकतो. फक्त फुलांच्या तोडणीनंतर झाडांना योग्य खते दिली पाहिजेत. या फुलाला वर्षभर मागणी असते. तसेच या फुलांवर जास्त रोगदेखील येत नाहीत. या फुलांचा गुच्छ, लग्न, मंदिर इत्यादींमध्ये याचा सर्रास वापर केला जातो. यापासून तेल आणि सेंट देखील बनवले जातात. यामुळे कधी सणांचा काळ नसला तरी याला इतर वेळी देखील मागणी असते. यामुळे यामधून आपल्याला चांगले पैसे मिळतात. यामुळे हे फायदेशीर आहे. यामध्ये मोठे नुकसान होण्याची भीती कमी आहे.

एक कंद फुल दीड ते सहा रुपयांना विकले जाते. एका एकराचा विचार केला तर तुम्हाला कंद फुलाची सुमारे १ लाख फुले मिळतील. यामधून तुम्हाला आरामात २ लाखांपासून ते ६ लाखांपर्यत उत्पादन मिळू शकते. यामुळे हे फायदेशीर आहे. याची शेती तुम्ही अगदी ३० ते ४० हजारात सुरु करू शकता. यामुळे याकडे लक्ष देऊन बाजाराचा अंदाज घेऊन जर लागवड केली तर तुम्ही पैसे कमवू शकता. भारतात पश्चिम बंगाल, कर्नाटक, तामिळनाडू, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश या ठिकाणी  याची मोठ्या प्रमाणावर लागवड केली जाते.

English Summary: Farmers, start this flower business with less money, you will get lakhs of rupees, know .. Published on: 11 January 2022, 06:43 IST

Like this article?

Hey! I am निंबाळकर ओंकार रमेश. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters