News

शेतकऱ्यांना जगाचा पोशिंदा म्हटले जाते. त्यांना जर सगळ्या गोष्टीनी साथ दिली तर त्याच्यावर आत्महत्या करण्याची वेळ येणार नाही. शेती करण्यासाठी अनेक यंत्रांची आपल्याला आवश्यकता भासत असते. यासाठी मोठ्या प्रमाणावर पैसे खर्च होतात. तसेच त्यासाठी राज्य आणि केंद्र सरकार कोट्यवधींची गुंतवणूक करत आहे. असे असताना आता एका शेतकरी पुत्राने एक नवीन शोध लावून एक यंत्र तयार केले आहे.

Updated on 14 January, 2022 2:33 PM IST

शेतकऱ्यांना जगाचा पोशिंदा म्हटले जाते. त्यांना जर सगळ्या गोष्टीनी साथ दिली तर त्याच्यावर आत्महत्या करण्याची वेळ येणार नाही. शेती करण्यासाठी अनेक यंत्रांची आपल्याला आवश्यकता भासत असते. यासाठी मोठ्या प्रमाणावर पैसे खर्च होतात. तसेच त्यासाठी राज्य आणि केंद्र सरकार कोट्यवधींची गुंतवणूक करत आहे. असे असताना आता एका शेतकरी पुत्राने एक नवीन शोध लावून एक यंत्र तयार केले आहे. यामुळे शेतकऱ्यांचे काम हलके होणार आहे. यामुळे या तरुणाचे कौतुक केले जात आहे.

मराठवाड्यातील अभियांत्रिकी शिक्षण घेणाऱ्या या शेतकरी कुटुंबातील मुलाने स्वयंचलित फवारणी यंत्राचा शोध लावला आहे. यामुळे त्याने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. योगेश गवांडे असे या तरुणाचे नाव आहे. योगशने चारशे पेक्षा जास्त मशीन बनवल्या आहेत व त्या जवळपास १५ राज्यांमध्ये पाठवलेल्या आहेत. त्याने बनवलेल्या या वस्तूला सगळीकडून मागणी आहे. यामुळे त्याचे कौतुक केले जात आहे. त्याने महाविद्यालयात निओ स्प्रे बनवला होता, तो फायदेशीर असल्याने आता त्याची मागणी वाढत आहे. अनेक शेतकऱ्यांनी त्याच्याकडे यासाठी मागणी देखील केली आहे.

यामुळे शेतकऱ्यांची वेळेची बचत होत आहे. हे यंत्र सुरू होताच त्याच्या नोझल मधून फवारणी सुरू होते. या फवारणी यंत्राला निओ स्प्रे पंप असे नाव दिले गेले आहे. यामधून ५ जणांना रोजगार मिळाल्याचे योगेश ने सांगितले आहे. यामध्ये सुरुवातीला त्याने अनेक बदल केले. अखेर त्याला यामध्ये यश आले आता त्याने बनवलले हे यंत्र चांगल्या प्रकारे काम करते. यामुळे अनेक शेतकऱ्यांनी याला पसंती दिली आहे. एका शेतकरी कुटूंबातील तरुणाने हे यंत्र बनवल्याने त्याचे कौतुक केले जात आहे.

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये देखील कला मोठ्या प्रमाणात असते पण त्यांच्या स्वभावामुळे त्यांना पाहिजे तसा वाव मिळत नाही. योगेश ने म्हणले आहे की, तरुणांनी कोणत्याच गोष्टीत स्वतःला कमी समजू नये. आपल्या मनात येणाऱ्या कल्पना सर्वांसमोर मांडा. आपल्याला आवडणाऱ्या गोष्टींमध्ये काम करा, आपल्याला नक्कीच यश मिळेल, असा सल्ला त्याने इतर तरुणांना दिला आहे. त्याने बनवलेल्या या वाहनाला चेन आहे, त्यामुळे याची दोन्ही चाके फिरतात. चाक असणाऱ्या एक लोखंडी स्टँडवर खताची पिशवी देखील लटकवता येते.

English Summary: Farmer's son's Discovery of a unique automatic sprayer ..
Published on: 14 January 2022, 02:33 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)