तसं बघायला गेलं तर शेती व्यवसाय करणे जोखमीचं काम. प्रचंड मेहनत, पूर्वनियोजन सगळं काही केलं तरी कोणत्या न कोणत्या गोष्टीमुळे शेतकरी बंधूना नुकसानीला सामोरे जावेच लागते. तरी देखील तरुण शेतकरी शेती व्यवसायात नवनवीन कल्पनांचा, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून यश संपादन करत आहेत. पारंपारिक शेती सोबत आधुनिक शेतीची कास धरत लाखो रुपये कमवण्याची किमया साधत आहेत. युवा पिढीचे शेती व्यवसायातील यशोगाथा आपण ऐकल्याचं असतील.
मात्र शेती व्यवसाय करणे परवडत नाही. त्यामुळे शेती व्यवसाय सोडून दुसरा व्यवसाय सुरु करण्यासाठी पठ्ठ्याने थेट बॅंकेकडून तब्ब्ल 6 कोटी 65 लाखाचे कर्ज मागितले. ही घटना आहे सेनगाव तालुक्यातील ताकतोडा येथील. शेतकरी कैलास पतंगे यांनी बॅंकेकडून इतक्या रकमेचे कर्ज मागून बॅंक अधिकाऱ्यांनाही चकित केले आहे. बॅंकेकडून शेतकऱ्यांना पीक कर्ज वेळेत मिळत नाही. त्यामुळे सेनगाव तालुक्यातील अल्पभूधारक शेतकऱ्याने हेलिकॉप्टर घेण्यासाठी भारतीय स्टेट बँकेकडे एवढ्या कर्जाची मागणी केली आहे. आता यावर भारतीय स्टेट बँक काय भूमिका घेणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
हेलिकॉप्टरसाठी मागितले 6 कोटी 65 लाखाचे कर्ज
हेलिकॉप्टरसाठी 6 कोटी 65 लाखाचे कर्जाची मागणी केल्यामुळे शेतकरी चांगलाच चर्चेचा विषय बनला आहे. पण त्याने एवढ्या रकमेचे कर्ज का मागितले असेल असा प्रश्न सगळ्यांना पडला असणार. शेतकरी कैलास पतंगे याबाबत बोलताना म्हणाले, की आजकाल तर सर्वच व्यवसायामध्ये स्पर्धा चालू आहे. मात्र निसर्गाच्या लहरीपणामुळे शेत पिकांचे बरेच नुकसान होत आहे. शिवाय आर्थिक नुकसान होते ते वेगळेच.अशातच पतंगे यांना अशी माहिती मिळाली की,हेलिकॉप्टरच्या व्यवसायातून एका तासात 65 हजार रुपये सहज कमवू शकतो. आणि त्यामुळेच त्यांनी या कर्जाची मागणी केली आहे.
बापरे! नदीपात्रात आढळले वापरलेले कोरोना चाचणी कीट; दोषींवर कारवाईची मागणी
हेलिकॉप्टरसाठी काय पण
हेलिकॉप्टरचा व्यवसाय करण्यासाठी शेतकरी कैलास पतंगे यांनी ठाम भूमिका घेतली आहे. अक्षरशः आपली शेती विकण्याचीही तयारी दर्शवली आहे. मात्र दोन एकर शेतीतून थोडीच हेलिकॉप्टर विकत घेता येईल म्हणून त्यांनी माघार घेतली आहे. मात्र शेतकरी कैलास पतंगे यांच्या अंदाजाचा सध्या राज्यभरात चांगलीच चर्चा रंगली आहे.
महत्वाच्या बातम्या:
“ओंकार तु शेतक-यांना विसरू नकोस हिच माझ्यासाठी गुरु दक्षिणा असेल!"
साखर उत्पादनात भारत देश जगात पहिल्या क्रमांकावर; तर 'या' राज्याने मारली बाजी
Published on: 16 June 2022, 05:21 IST