जनावरांचे दूध उत्पादन वाढवायचे असेल तर शेतकऱ्यांना दर्जेदार, जास्त उत्पादन देणारी चारा पिके आणि त्यांच्या सुधारित वाणांची माहिती असणे आवश्यक आहे. दर्जेदार हिरवा चाऱ्याचा वेळेवर पुरवठा होत नसल्यामुळे, पशुधनाला साधारणपणे पिकांच्या वाळलेल्या अवशेषांवर अवलंबून राहावे लागते. त्याचा थेट परिणाम जनावरांच्या आरोग्याची स्थिती, शारीरिक वाढ, प्रजनन क्षमता आणि त्यांच्या दूध उत्पादन क्षमतेवर दिसून येतो.
ज्वारीच्या सुधारित वाणांची हिरवा चारा म्हणून लागवड करून शेतकरी पशुधनासाठी अधिक हिरवा चारा मिळवू शकतात. ज्वारी हे देशातील प्रमुख चारा पिकांपैकी एक आहे, जे हिरवा चारा, कडबा आणि सायलेज या तिन्ही प्रकारात जनावरांसाठी उपयुक्त आहे. यात कोरड्या पदार्थाच्या आधारावर सरासरी 9-10 प्रतिशत क्रूड प्रोटीन, 60-65 प्रतिशत न्यूट्रल डिटर्जेंट फाइबर आणि 37-42 प्रतिशत अॅसिड डिटर्जेंट फाइबर आढळते. शेतकरी ज्वारीच्या खालील सुधारित जाती हिरवा चारा म्हणून लागवड करू शकतात.
हिरव्या चाऱ्यासाठी ज्वारीच्या सुधारित आणि विकसित वाण हिरव्या चाऱ्यासाठी ज्वारीच्या विविध जाती आहेत. यातील काही वाण संपूर्ण देशासाठी आहेत तर काही जाती देशातील ओळखल्या गेलेल्या राज्यांसाठी आहेत. हिरव्या चाऱ्यामध्ये ज्वारीचे उत्पादन होत असल्याने एकापेक्षा जास्त कापणी केलेल्या ज्वारीसाठी त्याचे वाण निवडावेत.
वाण - सी. एस.वी.-32 एफ ही वाण सर्व राज्यात लागवड केली जाऊ शकते. या वाणापासून 45-46 टन प्रति हेक्टराला उत्पादन मिळते. एच. जे -513 हे वाण उत्तर - पश्चिम भारतात लागवड केली जाते. या वाणापासून 40-43 टनाचे उत्पन्न प्रति हेक्टरावर होत असते. हरियाणा चरी 308 या वाणाची लागवड सर्व भारता करता येत असून 40-44 टनाचे उत्पादन प्रति हेक्टराला मिळत असते. एस.एल-44 या वाणाची लागवड पंजाब राज्यातील शेतात करता येते, तर या वाणाचे उत्पादन प्रति हेक्टरासाठी 45-50 टन होत असते. ज्वार चरी-6 या वाणाची लागवड मध्यप्रदेशात केली जाते.
हेही वाचा : Sesame Cultuvation: अशा पद्धतीने करा तिळीची लागवड आणि कमवा बक्कळ नफा
या वाणापासून मिळणारे उत्पादन 65 ते 70 प्रति हेक्टरासाठी मिळत असते. पूसा चरी संकर-109 या वाणाची लागवड उत्तर आणि पश्चिम भारतात केली जाते. या वाणापासून प्रति हेक्टरी 80-82 टन उत्पन्न होत असते. राजस्थान चरी -1 या वाणाची लागवड संपूर्ण भारतात केली जात असून 40-45 प्रति हेक्टरी टनाचं उत्पन्न मिळत असते. पूसा चरी -9 या वाणाची लागवड संपूर्ण भारतात केली जाते.
ज्वारीची पेरणी केव्हा व कशी करावी?
ज्वारीची लागवड वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या वेळी केली जाते. हिरवा चारा म्हणून त्याचा वापर होत असल्याने देशातील सर्व राज्यांमध्ये त्याची लागवड केली जाते. मे-जून हा काळ उत्तर भारतात पेरणीसाठी अनुकूल आहे, तर दक्षिण भारतात रब्बी आणि खरीप या दोन्ही हंगामात पेरणी केली जाते. हिरवा चारा म्हणून वापरण्यासाठी शेतकरी त्याचे बियाणे 30-40 किलो प्रति हेक्टर दराने पेरणी करू शकतात.
एका पेक्षा अधिक कापणी करता येणारी वाण
वाण सी.एस. एच -24 लागवड - संपूर्ण भारत, उत्पादन - 90-95
सी.एस.एच.- 20 लागवड -संपूर्ण भारत, उत्पादन - 90-95
सी.ओ.-29 लागवड -संपूर्ण, उत्पादन -100-150
एस.पी.एच.-1700 लागवड- मध्य भारत, उत्पादन - 100-105
एस. पी. एच. 1768, लागवड - मध्य भारत, उत्पादन - 100-105
एस. पी. वी. 2244 लागवड मध्य भारत, उत्पादन - 90-120
पी.सी.एच-109 लागवड उत्तर भारत, उत्पादन - 80-82
मीठी सुडान, लागवड - उत्तर भारत, उत्पादन 70-75
Published on: 22 December 2021, 11:41 IST