News

कृषी विज्ञान केंद्र, अकोला द्वारे दिनांक 20 ऑगस्ट ला भांभेरी तालुका तेल्हारा येथे लिंबू उत्पादक

Updated on 20 August, 2022 7:25 PM IST

कृषी विज्ञान केंद्र,अकोला द्वारे दिनांक 20 ऑगस्ट ला भांभेरी तालुका तेल्हारा येथे लिंबू उत्पादक शेतकऱ्यांसाठी हस्त बहर नियोजन या विषयी प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. श्री गजानन तुपकर, विषय विशेषज्ञ उद्यानविद्या कृषी विज्ञान केंद्र, अकोला यांनी आपल्या मार्गदर्शनात

बोलताना सांगितले की लिंबू पिकात मृग, आंबिया आणि हस्त बहार येत असतो परंतु हस्त बहाराची फळे उन्हाळ्यात विक्रीसाठी येत असल्याने त्यांना चांगला बाजारभाव मिळतो.As the fruits come for sale in summer, they fetch a good market price. मृग बहार हा फक्त 30 टक्के येतो परंतु याला खूप कमी मागणी असल्याने भाव खूप नगण्य असतात. आंबिया बहराला थोडे

भाव जास्त असतात. हस्त बहराचे नियोजन करताना उन्हाळा पासून बगीचा ला ओलित सुरू ठेवणे, जून मध्ये जि ए 50 पिपिएम ची फवारणी करणे, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात लीहोसिन ची फवारणी करणे आणि अन्नद्रव्यांचे एकात्मिक नियोजन करणे या विषयी सविस्तर माहिती दिली. ओलीत करताना आणि खते देताना त्यांचा कार्यक्षम वापर कसा होईल

या विषयी सविस्तर मार्गदर्शन केले. बोर्डो पेस्ट आणि बोर्डो मिश्रण, अमृत जल तयार करण्या विषयी सुद्धा त्यांनी मार्गदर्शन केले. प्रशिक्षण कार्यक्रम नंतर लिंबू बगीचास भेट देऊन शेतकरी बांधवांनी उपस्थित केलेल्या विविध समस्यांचे निराकरण करण्यात आले. प्रशिक्षण यशस्वीते साठी श्री विजय राठी, श्री सुनील इंगळे यांनी अथक परिश्रम घेतले.

English Summary: Farmers should plan palm blossom in lemon for more income - Gajanan Tupkar
Published on: 20 August 2022, 07:25 IST