News

बहुतेक ठिकाणी खरीप, रब्बी हंगामात हिरवा चारा उपलब्ध होतो. त्यामुळे जानेवारीपासून पुढे तो जूनपर्यंत जनावरांना हिरवा चारा नसतो. हिरवी वैरण सुकवून ठेवली किंवा मुरघास तयार करून तो चारा टंचाई असताना वापरू शकतो.

Updated on 06 March, 2023 10:27 AM IST

बहुतेक ठिकाणी खरीप, रब्बी हंगामात हिरवा चारा उपलब्ध होतो. त्यामुळे जानेवारीपासून पुढे तो जूनपर्यंत जनावरांना हिरवा चारा नसतो. हिरवी वैरण सुकवून ठेवली किंवा मुरघास तयार करून तो चारा टंचाई असताना वापरू शकतो.

सुकी वैरण :
◆हिरवा चारा योग्य वेळी व योग्य प्रकारे वाळवून सुकी वैरण तयार करता येते.
◆हिरवा चारा सुकवून त्यातील पोषक द्रव्ये, खनिजे व जीवनसत्वे टिकविता येतात. उत्तम प्रतीची सुकी वैरण बनविण्याचे यश हे चारा कापण्याची वेळ, त्याची वाढ, ऋतुमान व चारा वाळविण्याची इत्यादी गोष्टीवर अवलंबून असते.
◆चारा फुलोऱ्यात असताना कापल्यास त्यातील पोषक द्रवे जास्तीत जास्त प्रमाणात टिकतात. गवतास बुरशी नसावी, खराब वास नसावा.
◆सर्वसाधारणपणे चाऱ्यामध्ये ६५.८५ टक्के पाण्याचे प्रमाण असते. परंतु सुकी वैरण बनविताना चाऱ्यामध्ये पाण्याचे प्रमाण १५ टक्के असावे.

द्विदल चाऱ्याची सुकी वैरण : या प्रकारच्या वैरणीमध्ये प्रथिने, खनिजे आणि जीवनसत्वे जास्त असतात. हा चारा खाण्यास रुचकर असतो. द्विदल सुकी वैरण बनविण्यासाठी लुसर्न, बरसीम, गवार, चवळी इत्यादी पिकांचा वापर करतात.

स्वेच्छा मरणासाठी राष्ट्रपतींना पत्र! नाशिकच्या शेतकऱ्यांचे कांद्यासाठी उपोषण..

मुरघासासाठी खड्डा :
◆खड्यांची रचना, त्यांचा आकार आणि बांधणीची रचना ही त्या ठिकाणची स्थानिक परिस्थिती, जमिनीतील पाण्याची पातळी आणि जनावरांची संख्या यावर अवलंबून असते.
◆खड्याच्या भिंती गुळगुळीत असाव्यात. भिंतींना भेगा नसाव्यात. खड्याची खोली ही त्या भागातील जमिनीतील पाण्याच्या पातळीवर अवलंबून असते. जेथे पाण्याची पातळीवर असते तेथे जमिनीवर मनोरे बांधावेत. साधारणत: १ मीटर लांब, १ मीटर रुंद आणि १ मीटर खोल इतक्या आकाराच्या खड्यात १ टन चारा साठवता येतो.

◆जमिनीत खड्डा खोदताना त्याची लांबी ३५-१०० मीटर, रुंदी ५-९ मीटर, खोली ३ ते ९ मीटर पर्यंत ठेवता येते.
◆जमिनीवर मनोरा बांधताना त्याची उंची १२ ते ३५ मीटर, व्यास ४ ते ६ मीटर पर्यंत ठेवावा.
◆काही शेतकरी जमिनीवर सिमेंटच्या गोल पाइप उभा करून त्यात चारा साठवू शकतात परंतु त्यात हवा शिरणार नाही याची संपूर्ण काळजी घ्यावी. उथळ खड्डे किंवा चर, खंदकासारखे लांबट खड्डे बनविता येतात. अशा खड्यांची लांबी व रुंदी प्रत्येकी २.४ मीटर ठेवावी. याला ट्रेन्च सायलो म्हणतात.

यशवंत कारखाना सुरू होणार का? हालचाली सुरू, सभेचे आयोजन

कडबा कुट्टी यंत्राच्या साह्याने चाऱ्याचे बारीक १.५ ते २.५ सेंमी एवढे तुकडे करावेत. मुरघासाचा खड्डा साफ करून घ्यावा. तळाशी आणि बाजूंच्या भिंती यावर पसरले जाईल असे काळ्या रंगाचे प्लास्टिक पसरावे. खड्यांच्या आकारमानापेक्षा हे प्लास्टिक मोठे असावे कारण मुरघास खड्यात चारा भरताना जमिनीच्या वर १ ते १.५ मीटर पर्यंत भरावा लागतो. त्यानंतर त्यावर बाहेर सोडलेले प्लास्टिक अवरणासारखे पसरावे लागते.

◆कुट्टी केलेला चारा खड्यात दाबून भरून घ्यावा. त्यामुळे त्यातील हवा बाहेर निघून जाईल. चाऱ्याचा थर जमिनीच्यावर १ ते १.५ फूट आल्यावर त्यावर वाळलेले गवत, ऊस पाचट, गव्हाचे काड किंवा पॉलिथिन टाकावे. त्यावर शेण मातीचा थर द्यावा. त्यामुळे खड्डा पूर्णपणे बंद होईल.
◆हा चारा वाळलेल्या चाऱ्यापेक्षा जास्त पौष्टिक असतो. हिरव्या चाऱ्यातील ८५ टक्के ऊर्जा या चाऱ्यात असते. ६० ते ७० टक्के ऊर्जा वाळलेल्या चाऱ्यात शिल्लक असते.

महत्वाच्या बातम्या;
रब्बी ज्वारी
बिल गेट्स यांनी IARI ला भेट, हवामान बदल आणि वैज्ञानिक शेतीवर केली चर्चा..
पिंजऱ्यातील मत्स्यशेतीतून शेतकऱ्यांना मिळेल दुप्पट नफा, ही पद्धत वापरून पहा

English Summary: Farmers should plan fodder storage like this
Published on: 06 March 2023, 10:27 IST