अनेकदा आपण बघत असतो की शेतात अनेक ठिकाणी आपल्याला साप बघायला मिळतात. अनेकदा ते शेतात काम करत असताना शेतकऱ्यांना चावतात. यामध्ये साप विषारी असला तर यामध्ये मृत्यू देखील होण्याची शक्यता असते, यामुळे खबरदारी घेणे गरजेचे असते. असे असताना अनेकांना साप चावल्यावर काय करावे याची माहिती नसते. यामुळे त्या शेतकऱ्यांचा मृत्यू होतो. यामुळे साप चावल्यावर काय करावे याची माहिती असणे गरजेचे असते. साप चावल्यावर चाव्याला स्वच्छ, कोरड्या पट्टीने झाकून ठेवावे, घाबरून जाऊ नका तसेच इथून तिथं फिरणे टाळा जाग्यावर थांबा किंवा बसून रहा जास्त हालचाल करू नका.
तसेच लवकरात लवकर जवळच्या रुग्णालयात दाखल व्हा. तसेच आपल्याला कोणता साप चावला आहे. याची माहिती तुमच्याजवळ असुद्या, जेणेकरून त्यावर लवकरात लवकर उपचार होतील. तसेच अनेकजण ही जखम कापण्याचा प्रयत्न करतात, तर तसे काहीही करू नका. तसेच बर्फ लावू नका किंवा जखम पाण्यात बुडू नका. तसेच डॉक्टरांच्या परवानगीशिवाय कोणतेही औषध घेऊ नका. यावेळी न घाबरता स्थिर राहण्याचा प्रयत्न करा. फक्त लवकर डॉक्टरांकडे जाण्याचा प्रयत्न करा.
तसेच ज्याठिकाणी सापाचा जास्त वावर असतो, अशा ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करू नका, तसेच त्याची माहिती नसेल तर त्याला पकडण्याचा प्रयत्न करू नका. साप चावल्याची लक्षणे आपल्याला ओळखता आली पाहिजेत. यामध्ये साप चावल्यावर तीक्ष्ण आणि जळजळ वेदना होतात. लालसरपणा आणि सूज येते. असामान्य रक्त गोठणे आणि रक्तस्त्राव होतो. कमी रक्तदाब, उलट्या आणि मळमळ होते. श्वास घेण्यास त्रास होतो. घाम येतो. स्नायूंमध्ये सुन्नपणा जाणवते. अशाप्रकारे आपल्याला आपल्या शरीरात बदल जाणवतो, यामुळे दवाखान्यात जाण्यास उशीर करू नये.
तसेच तुमच्या घरात आसरा शोधणाऱ्या सापांपासून सावध रहा. तुम्हाला तुमच्या घरात साप दिसल्यास, ताबडतोब तुमच्या काउंटीमधील प्राणी नियंत्रण संस्थेला कॉल करा. सापाला मारण्याचा प्रयत्न करू नका. या गोंधळात तुम्हाला साप देखील चावण्याची शक्यता असते. यामुळे शांततेत काम करावे, कोणाला साप चावला असेल तर सापाचा रंग आणि आकार पाहण्याचा प्रयत्न करा. बहुतांश लोक काठी हातात घेतात किंवा उचलण्याचा प्रयत्न करतात परंतु साप उचलू नका किंवा त्याला पकडण्याचा प्रयत्न करू नका. कमी विषारी आणि विषारी सापांची माहिती घ्या, यामुळे याचा उपयोग होईल.
Published on: 19 January 2022, 01:47 IST