News

अकोला: दिवसेंदिवस शेतकऱ्यांकडील शेती कमी होत चालली आहे. शासनाने गट शेती करण्यासाठी विविध योजना लागू केल्या आहेत. गावातील किमान 50 पेक्षा जास्त शेतकऱ्यांचा गट बनवून शेती करावी, असे आवाहन पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी केले.

Updated on 29 December, 2018 8:07 AM IST


अकोला:
 दिवसेंदिवस शेतकऱ्यांकडील शेती कमी होत चालली आहे. शासनाने गट शेती करण्यासाठी विविध योजना लागू केल्या आहेत. गावातील किमान 50 पेक्षा जास्त  शेतकऱ्यांचा गट बनवून शेती करावी, असे आवाहन पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी केले.  

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या क्रिडांगणावर आज डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) व कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पाच दिवसीय ॲग्रोटेक-2018 या राज्यस्तरीय भव्य कृषी प्रदर्शनी व चर्चासत्राच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी खासदार तथा महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद पुणेचे उपाध्यक्ष ॲड. संजय धोत्रेविद्यापिठाच्या कार्यकारी समितीचे सदस्य तथा आमदार गोपीकिशन बाजोरीयाविद्यापिठाच्या कार्यकारी समितीचे सदस्य तथा आमदार रणधीर सावरकर, कृषी विद्यापिठाच्या कार्यकारी परिषदेचे सदस्य जैनूद्दीन जव्हेरीमहापौर विजय अग्रवालप्रगतीशील शेतकरी तथा कृषी विद्यापिठाच्या कार्यकारी परिषदेचे सदस्य गणेश कंडारकरविनायक सरनाईकविद्यापिठाचे कुलगुरु डॉ.विलास भालेविभागीय कृषी सहसंचालक सुभाष नागरे, आत्माचे प्रकल्प संचालक राजेंद्र निकम, कृषी विद्यापीठ परभणीचे विस्तार शिक्षण संचालक प्रदिप इंगोले, कृषी अभियांत्रिकी अधिष्ठाता डॉ. नागदेवे, विस्तार शिक्षण संचालक डॉ. दिलीप मानकरसंशोधन संचालक डॉ. विलास खर्चे यांची प्रमुख उपस्थिती होती.

डॉ. रणजीत पाटील पुढे म्हणाले की, शेतकऱ्यांनी परंपरागत शेती न करता आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन कमी उत्पादन खर्च आणि जास्त उत्पादन देणारे वाण पिकवावेसेंद्रीय शेतीला प्राधान्य द्यावे. गोधनामुळे शेती समृद्ध होत असल्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या गोधनात वाढ करावीअसे आवाहन त्यांनी शेतकऱ्यांना केले. शासनाच्या धोरणामुळे शेतकऱ्यांसाठी असलेल्या व्यक्तीगत  लाभाच्या योजनेचा लाभ थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होत आहे. यामुळे पारदर्शकता निर्माण झाली आहे. 

जलयुक्त शिवारखारपाणपट्टयासाठी हवामानावर आधारीत पीक पेरणी योजना यासारख्या योजनामुळे शाश्वत शेती करून शेतकऱ्यांनी शेतीतील गुंतवणूक वाढवावी तसेच कौशल्य विकासाच्या योजनांतून शेतकऱ्यांच्या मुलांच्या हाताला कौशल्य निर्माण करून शेतीवर प्रक्रिया असणारे उद्योग सुरू करावेत, असे सांगून पालकमंत्री म्हणाले की, कृषी विद्यापिठांनी संशोधन करुन नवनविन वान संशोधित करावेशेतकऱ्यांना वीजपाणी व शेतमालाला योग्य भाव देण्यासाठी शासन कटीबद्ध असून कृषी विद्यापीठांनी संशोधन व तंत्रज्ञान पोहोचविण्याची जबाबदारी घ्यावी, असे प्रतिपादन डॉ. रणजीत पाटील यांनी केले. शेतकऱ्यांनी कृषी विद्यापिठाने आयोजित केलेल्या कृषी प्रदर्शनी व चर्चासत्राचा लाभ घ्यावा, असे आवाहन पालकमंत्री यांनी केले.

डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापिठाने शेतकऱ्यांवर आलेले कपाशी पिकांवरील गुलाबी बोंड अळीचे संकट विद्यापीठ, कृषी विभाग, कृषी विज्ञान केंद्रआयसीआर व स्वत: शेतकऱ्यांयांनी समन्वय साधून संकट दूर केले आहे. याबद्दल सर्वांचे आभारयुक्त कौतुक केले पाहिजे, असे सांगून खासदार संजय धोत्रे पुढे म्हणाले की शेतीचा समतोल बिघडत चाललेला आहे. अनेक समस्या निर्माण होत आहे. गोधन कमी होत आहे. प्लास्टिकचा वापर वाढलेला होता. परंतू शासनाने प्लास्टिक वर बंदी घालून प्लास्टीकचा वापर कमी केला आहे. यामुळे शेतकऱ्यांना सुवर्ण संधी प्राप्त झाली आहे. विद्यापिठांनी संशोधन करतांना शेतकऱ्यांना केंद्रस्थानी राहून संशोधन करावे व शासनाने धोरण ठरवितांना शेतकऱ्यांशी समन्वय साधून धोरण ठरवावे. शासनाने शेतकऱ्यांच्या हिताची कामे करावी यासाठी सर्व विभागांनी शासनाला सहकार्य करण आवश्यक असल्याचे खासदार संजय धोत्रे यांनी सांगितले.

कृषी विदयापीठातर्फे संशोधन, शिक्षण व विस्तार शिक्षणाचे कार्यक्रम सतत घेण्यात येत असतात. शेतकऱ्यांसाठी लोकाभिमुख संशोधन व्हावे यासाठी विद्यापीठ सतत प्रयत्न करीत असतात. संशोधनाच्या माध्यमातून कमी खर्चाची शेती कशी करावी यासाठी विद्यापीठ शेतकऱ्यांना मार्गदर्शन करीत असते मागील वर्षी विदयापीठ 1 हजाराहून जास्त गावात पोहोचले आहे, अशी माहिती विद्यापिठाचे कुलगुरु डॉ. विलास भाले यांनी प्रास्ताविकातून दिली.

सर्वप्रथम दिपप्रज्वलनाने कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी विद्यापिठाच्या कृषी संजीवनी-2019 व कृषी दिनदर्शिकेचे विमोचन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कृषी प्रक्रिया विशेषांकसंशोधन संचालनातर्फे व्हिजन 2050, विदर्भातील गुलाबी बोंड अळी अभियान 2018-19, महाराष्ट्रातील पिकांकरीता सुक्ष्म अन्यद्रव्यांच्या शिफारशी अशा विद्यापिठाच्या विविध विभागाने काढलेल्या वेगवेगळ्या पुस्तिकेंचे विमोचन करण्यात आले. तत्पूर्वी पालकमंत्री डॉ. रणजित पाटील, खासदार संजय धोत्रे व इतर मान्यवरांनी यांनी यावेळी प्रदर्शनीमध्ये उभारलेल्या विविध स्टॉलला भेट दिली.

कार्यक्रमाचे संचालन डॉ. प्रदिप बोरकर व उपस्थितांचे आभार आत्माचे प्रकल्प संचालक तथा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र निकम यांनी केले. यावेळी विद्यापिठातील शास्त्रज्ञ, प्राध्यापकअधिकारीजनसंपर्क अधिकारी डॉ. किशोर बिडवे, कर्मचारीप्रगतीशील शेतकरी स्टॉलधारक व शेतकरी उपस्थित होते. 

English Summary: Farmers should move towards group farming
Published on: 28 December 2018, 08:42 IST