पेरलं तर उगवत अस म्हणले जाते मात्र शेतकऱ्यांच्या बाबतीत अस होत नाही. खरीप हंगामात पाहायला गेले तर पावसामुळे हानी झाली त्यामुळे आता खरीप हंगाम रब्बी मध्ये भरून काढायचा अस तत्व शेतकऱ्यांचे होते तर आता रब्बी मध्ये तर सुरुवातीला च नुकसान झाले आहे. मराठवाडा मधील शेतकऱ्यानी पेरण्या तर केल्या पण पिकाची उगवण च झाली नाही त्यामुळे आता पुन्हा पेरणी करावी लागतेय का असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे पडला आहे.
नेमकी कशामुळे उगवण झाली नाही:-
वेळेवर पेरणी झाल्यावर उत्पादन चांगल्या प्रकारे निघेल अशी अशा शेतकऱ्यांच्या मनात होती. मात्र पहिल्या पेऱ्यातील गहू, ज्वारी आणि हरभरा या पिकाची पेरणी तर केली मात्र उगवनच झाली नाही त्यामुळे शेतकरी वर्गात चिंता वाढली आहे. उस्मानाबाद आणि बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांपुढे हे संकट ओढलेले आहे.१५ ऑक्टोबर पर्यंत पावसाने राज्यात धुमाकूळ घातला त्यामुळे खरीप हंगामातील पिकांचे नुकसान झाले पण हे पोषक वातावरण रब्बी साठी चांगले होईल असे मानले गेले. पेरणी ला उशीर झाल्याने शेतकऱ्यांनी हलकी मशागत केली आणि पेरणीला सुरुवात केली. जमिनीत ओलावा होता मात्र जास्त पाऊस पडल्याने जमीन आवळली गेली त्यामुळे बियांची वाढ होईल अशी परिस्थिती न्हवती. त्यामुळे पिकांची उगवण झाली नाही तर काही भागात कोरड्या क्षेत्रावर सुद्धा उगवण झाली नाही.
काय आहे पर्याय?
कृषीतज्ञ रामेश्वर चांडक सांगतात की यावेळी सरासरी पेक्षा जास्त पाऊस पडला असल्याने पेरलं की उगवेल हा गोड गैरसमज शेतकऱ्यांनी दूर ठेवावा. जास्त पावसामुळे शेत भुसभूषित आणि आवळून गेले आहे त्यामुळे पेरणी करण्याआधी पूर्व मशागत आणि शेत ओले करूनच पेरणी करावी नाहीतर पीक उगवणार नाही. जर तुम्ही जास्त गडबड केली तर वेळ आणि पैसे सुद्धा वाया जातील.
अवकाळी पावसामुळे दिलासा:-
मराठवाडा मध्ये बुधवारी रात्री अचानक पावसाने हजेरी लावल्याने खरीप हंगामातील कापसाचे नुकसान जरी झाले तरी रब्बी मध्ये जे पेरले आहे ते उगवण्यास मदत होईल असा अंदाज व्यक्त केला आहे.
Published on: 05 November 2021, 02:01 IST