News

यावेळी वसमतचे कार्यसम्राट आमदार तथा संचालक राजू भैया नवघरे यांनी देखील शेतक-यांना मार्गदर्शन केले. या प्रसंगी उपाध्यक्ष डॉ सुनिल कदम, डॉ शिला कदम, संचालक शहाजी देसाई, श्रिधर पारवे व त्यांच्या सुवैद्य पत्नी,बालासाहेब बारहाते यासह सर्व संचालक उपस्थित होते.

Updated on 06 November, 2023 6:17 PM IST

आनंद ढोणे

परभणी : पूर्णा सहकारी साखर कारखाना कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक सभासद शेतकऱ्यांनी इतर साखर कारखान्यास ऊस न देता आपला ऊस पूर्णा सहकारी साखर कारखान्यास द्यावा असे अवाहन पूर्णा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन तथा साखर महासंघाचे अध्यक्ष, माजीमंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांनी केले आहे. आज (दि.६)रोजी पूर्णा सहकारी साखर कारखान्याचा ४३ व्या बायलर अग्निप्रदीपन व ऊस मोळी पुजन कार्यक्रमात पार पडला. यावेळी ते बोलत होते.

यावेळी वसमतचे कार्यसम्राट आमदार तथा संचालक राजू भैया नवघरे यांनी देखील शेतक-यांना मार्गदर्शन केले. या प्रसंगी उपाध्यक्ष डॉ सुनिल कदम, डॉ शिला कदम, संचालक शहाजी देसाई, श्रिधर पारवे व त्यांच्या सुवैद्य पत्नी,बालासाहेब बारहाते यासह सर्व संचालक उपस्थित होते. कार्यकारी संचालक सुनील दळवी यांनी सुत्रसंचलन केले. सदर कार्यक्रमास माजी आमदार पंडीतराव देशमुख, महागावकर, रामचंद्र बागल, हरिभाऊ शेळके, सुभाष लालपोतू, उतमराव कदम,संचालक प्रलादराव काळे सह ऊस उत्पादक शेतकरी उपस्थित होते.

यावेळी आमदार नवघरे म्हणाले की, ऊस कुठे न देता पूर्णा साखर कारखानाला द्या, उस उत्पादक शेतकऱ्यांना कोणतीही अडणच येणार आहे. अडचण असल्यास सभासद म्हणून आणि कुटुंब त्यावर मार्ग काढू, असं आश्वासन देखील त्यांनी यावेळी दिले. तसंच मागील हंगामात ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी बाकीच्या कारखान्यांना ऊस दिला पण त्यांचे पैसे ८ महिने मिळाले नाहीत. तसंच आपला कारखाना आपली लक्ष्मी आहे त्यामुळे कारखाना चालवणे आपले कर्तव्य आहे, असं देखील नवघरे म्हणाले.

English Summary: Farmers should give cane to Purna Sugar Factory Sugarcane Crushing
Published on: 06 November 2023, 06:17 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)