News

चिखली- खरीप हंगामाला सुरुवात होणार असून शेतकरी शेती मशागतीच्या कामास लागला आहे. शेतकऱ्यांना खते,बियाण्यांच्या खरेदीसाठी गैरसोय होऊ नये, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांची कृषी केंद्रांवर गर्दी होऊ नये,बियाणे, खतांची मागणी केल्यास शेतकऱ्यांना बियाणे व खते ऑनलाईन नोंदणीच्या माध्यमातून बांधावर उपलब्ध करून देण्याचा उपक्रम वाशिम कृषी विभागाने सुरु केला आहे.तोच उपक्रम जिल्हा कृषी विभागाने राबवून शेतकऱ्यांची

Updated on 25 May, 2021 4:34 PM IST

ऑनलाइन नोंदणी करुण बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खते,बियाणे बांधावर देण्यात यावे,अशी मागणी स्वाभिमानीचे नेते तथा डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे सदस्य विनायक सरनाईक यांनी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांच्याकडे दि२४मे२०२१रोजी केली आहे.

कोरोनाचे संकट पाहता शेतकर्याना थेट बांधावर खते आणि बियाणे उपलब्ध करुण देण्याचा निर्णय वाशिम कृषी विभागाणे घेतला आहे.यासाठी कृषी विभागाणे एक स्वतंत्र गुगल लिंक तयार केली आहे. गुगल लिंक व्दारे तालुक्यासाठी फाॅम तयार करण्यात आला असुन संबंधीत नजीकच्या कृषी सेवा केंद्र निवडीची सुविधा शेतकरी व शेतकरी गटांना तयार करुण देण्यात आली आहे.यामधे शेतकर्याना आॅनलाइन नोंदणी करता येणार आहे. खते,बियाणे मिळण्यासाठी तालुकास्तरावर माहिती स्तनियंत्रण कक्ष देखील स्थापन केला गेला आहे.

तर कृषी सहाय्यक व कृषी विभागा मार्फत बि-बियाणे,खते मागणी नुसार बांधावर पोच दिले जाणार असल्याने वाशिम कृषी विभागा प्रमाणेच कोरोनाची परीस्थीती पाहता बुलढाणा जिल्ह्यातही हा उपक्रम कृषी विभागाकडुन राबवण्यात यावा, शेतकर्याची ऑलाइन नोंदणी करुण सर्वच तालुक्यामधे शेतकर्याना बांधावर,घरपोच खते,बियाणे उपलब्ध करुण देण्यात यावे,यावर तातडीने उपाययोजना व्हाव्यात व शेतकर्याना कडक निर्बध काळात सहकार्य करावे अशी मागणी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी नरेंद्र नाईक,तालुका कृषी अधिकारी शिंदे यांच्याकडे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते तथा डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कार्यकारी परीषद सदस्य विनायक सरनाईक यांनी एका पत्राद्वारे केली आहे.

English Summary: Farmers should be given seeds and fertilizers on their farms - Vinayak Sarnaik
Published on: 25 May 2021, 03:26 IST