News

महाराष्ट्र शासनाने राज्यात दुष्काळ जाहिर करुन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा. परीस्थितीचा तातडीने आढावा घ्यावा. तसेच पिण्याच्या पाण्याचे टँकर, जनावरांसाठी चारा छावण्या आणि इतर दुष्काळी कामे हाती घेण्यासंदर्भात तातडीने सकारात्मक विचार करुन अंमलबजावणी करावी.

Updated on 24 August, 2023 1:54 PM IST

मुंबई 

राज्यात गेल्या एक महिन्यापासून पावसाने दडी दिली आहे. शेतकऱ्यांना आता पावसाअभावी पीके वाया जाण्याची चिंता सतावत आहे. त्यामुळे शेतकरी चिंतातूर झालेत. त्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विट केलं आहे. सरकारने राज्यात दुष्काळ जाहीर करुन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी केली आहे.

खासदार सुळे ट्विटमध्ये म्हणाल्या की, "महाराष्ट्रात जुन, जुलै या महिन्यात अपेक्षित पाऊस झालेला नाही. त्यातच या ऑगस्ट महिन्यात देखील सरासरीपेक्षा सुमारे ६८ टक्क्यांनी पाऊस कमी आहे. दि.१ ते १८ ऑगस्ट दरम्यान सर्वच विभागांत पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा ८० टक्क्यांनी कमी आहे. बहुतेक ठिकाणी पाऊस पडलेला नाही. ही परिस्थिती भीषण असून शेतकऱ्यांचे हातचे पीक निघून गेले आहे. हे पाहता या शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ मिळणे आवश्यक आहे."

"यासोबतच महाराष्ट्र शासनाने राज्यात दुष्काळ जाहिर करुन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा. परीस्थितीचा तातडीने आढावा घ्यावा. तसेच पिण्याच्या पाण्याचे टँकर, जनावरांसाठी चारा छावण्या आणि इतर दुष्काळी कामे हाती घेण्यासंदर्भात तातडीने सकारात्मक विचार करुन अंमलबजावणी करावी", अशी मागणी सुळे यांनी केली आहे.

दरम्यान, खासदार सुळेंनी राज्यात दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली आहे. राज्यात पावसानं दडी मारल्यानं बळीराजा चिंतेत आहे. मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यात पाण्याची टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. विदर्भातील काही जिल्हे आमि कोकणात काही प्रमाणात पावसानं हजेरी लावली आहे. मात्र, अन्य भागात पावसानं दडी मारल्याचं चित्र दिसत आहेत. त्यामुळं हातची पीकं वाया जाण्याची भीती निर्माण झालीय. त्यामुळं राज्यात पाणी टंचाईचं संकट येण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे.

English Summary: Farmers should be given relief by declaring drought in the state Supriya Sule's demand to the government
Published on: 24 August 2023, 01:54 IST