News

गेल्या काही दिवसांपासून राज्यात थंडीचा कडक वाढला आहे. मागील आठ दिवसांपूर्वी राज्यात काही ठिकाणी पाऊस पडला तर काही ठिकाणी बर्फ दृष्टी झाली. यामुळे शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर या पावसामुळे राज्यात थंडी मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

Updated on 18 January, 2022 5:06 PM IST

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यात थंडीचा कडाका वाढला आहे. मागील आठ दिवसांपूर्वी राज्यात काही ठिकाणी पाऊस पडला तर काही ठिकाणी बर्फ दृष्टी झाली. यामुळे शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर या पावसामुळे राज्यात थंडीत मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

हवामान (Weather) विभागाच्या अंदाजानुसार राज्यातील काही भागांमध्ये पुन्हा गारपीटीची शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे. हवामान (Weather) विभागाच्या अंदाजानुसार खान्देश, विदर्भ या भागात गारपीटीचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. राज्यात अनेक भागात मागील काही दिवसापासून जोरदार पावसासह गारपीटीने हजेरी लावली आहे.

थंडीच्या दिवसात पाऊस सुरूच असल्यामुळे शेतकरी मोठ्या अडचणीत आहे. विदर्भात झालेल्या गारपिटीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार 21 आणि 22 जानेवारीला तुरळक ठिकाणी गारपीटही होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

खराब वातावरणामुळे शेतकरी आधीच मेटाकुटीला आला आहे. आता आणखी एक संकट शेतकऱ्यांसमोर उभे राहिले आहे. गहू, कांदा, हरभरा आणि फळबागांना याचा मोठा फटका बसला आहे. या खराब वातावरणामुळे पिकांवर रोगांचे प्रमाण वाढले आहे. कांदा पिकावर करप्या रोगाचा प्रादुर्भाव जाणवू लागला आहे.

English Summary: Farmers' sarees do not end; Again a new crisis came to the fore
Published on: 18 January 2022, 05:06 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)