गेल्या काही दिवसांपासून राज्यात अनेक ठिकाणी वातावरण बदलाचे परिणाम दिसून येत आहेत, यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. असे असताना आता उत्तर भारतात सध्या तापमानात बदल होत असल्याचे चित्र दिसत आहे. तापमानात वाढ होत असल्याने नागरिकांना दिलासा मिळाला असतानाच मात्र पुढच्या काही दिवसात पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे 7 ते 9 मार्च ला महाराष्ट्रातही पाऊस पडू शकतो, असे अंदाज लावले जात आहेत. यामुळे आता शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
राज्यात काल ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. वातावरणातील उष्णता कमी झालेली दिसली. त्यामुळे आज 7 आणि 9 मार्चला महाराष्ट्र, गुजरात, पूर्व राजस्थान व पश्चिम मध्य प्रदेशात विजांच्या कडकडाटासह काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. अनेक शेतकऱ्यांची पिके सध्या काढणीला आली आहेत. यामुळे ती पदरात पाडून घेण्यासाठी शेतकऱ्यांची पळापळ सुरु आहे.
दिल्लीत हवामानात मोठा बदल दिसून आला. काल दिल्लीत आर्द्रतेची पातळी 85 ते 47 टक्के इतकी नोंदवली गेली. काल शहरात ढगाळ वातावरण राहिले काल कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे 28 आणि 13 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला होता. जो की काल योग्य ठरला असून ढगाळ वातावरण पाहायला मिळाले. यामुळे देशात अनेक ठिकाणी याचे बदल दिसून येणार आहेत. तसेच कोकणात ढगाळ वातावरण, हलक्या पावसाची शक्यता आहे.
मराठवाडा, मध्य महाराष्ट्र विदर्भात गडगडाटासह पावसाची शक्यता आहे. महराष्ट्रात देखील 7 ते 9 मार्च दरम्यान ढगाळ वातावरण राहून काही ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राज्यात सध्या हरभरा, गहू काढणी चालू आहे. 7 मार्चपर्यंत शेतकऱ्यांनी हरभरा, गहू काढूण घेणे गरजेचे आहे, असे सांगण्यात येत आहे. त्यामुळे 7 ते 9 मार्च ला नेमक्या कोणत्या स्वरूपाचा पाऊस पडेल हे पाहणे आवश्यक राहील. तसेच येणाऱ्या पावसाने शेतकऱ्यांचे नुकसान होणार का असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.
Published on: 07 March 2022, 09:34 IST