News

नवी दिल्ली: केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंग तोमर यांनी आज व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या कृषीमंत्र्यांशी संवाद साधला आणि प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना, छोटे आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी निवृत्ती वेतन योजना आणि किसान क्रेडिट कार्डसारख्या प्रमुख सरकारी योजनांच्या अंमलबजावणीबाबत चर्चा केली.

Updated on 17 June, 2019 7:28 AM IST


नवी दिल्ली:
केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंग तोमर यांनी आज व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या कृषीमंत्र्यांशी संवाद साधला आणि प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना, छोटे आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी निवृत्ती वेतन योजना आणि किसान क्रेडिट कार्डसारख्या प्रमुख सरकारी योजनांच्या अंमलबजावणीबाबत चर्चा केली.

केंद्रीय कृषीमंत्र्यांनी सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना पात्र शेतकरी कुटुंब/लाभार्थ्यांची नोंदणी वेळेत पूर्ण करण्याचे आवाहन केले. जेणेकरून त्यांना पीएम-किसान योजनेअंतर्गत एप्रिल ते जुलै 2019 या कालावधीतील लाभ त्यांच्या बँक खात्यात थेट हस्तांतरीत करता येईल.

कृषीमंत्र्यांनी सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना 18 ते 40 वयोगटातल्या शेतकऱ्यांसाठी सुरू करण्यात आलेल्या निवृत्तीवेतन योजनेची माहिती दिली. तसेच या योजनेबाबत जनजागृती करण्याचे आवाहन त्यांनी केले. पुढल्या 100 दिवसात किसान क्रेडिट कार्ड योजनेअंतर्गत 1 कोटी शेतकऱ्यांना सामावून घेण्यासाठी गावनिहाय अभियान राबवण्याची विनंती सर्व राज्यांना केली.

English Summary: Farmers' registration process will be expedited for the benefit under the PM-Kisan Scheme
Published on: 16 June 2019, 07:58 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)