News

शेतकऱ्यांनी जर बाजारभाव आणि लागवडीचा अंदाज लावून शेती केली तर त्याला चांगला बाजारभाव मिळतो, असे असताना अनेकदा असे घडत नाही. यामुळे सगळेच एखादे पीक घेतात आणि यामुळे बाजारभाव पडतो. यामुळे मोठे नुकसान होते. सध्या उन्हाळ कांदा लागवडीसाठी सर्व गोष्टी पोषक ठरल्यामुळे शेतकऱ्यांनी कांदा लागवडीला पसंती दिल्याचे दिसत आहे.

Updated on 29 January, 2022 11:32 AM IST

शेतकऱ्यांनी जर बाजारभाव आणि लागवडीचा अंदाज लावून शेती केली तर त्याला चांगला बाजारभाव मिळतो, असे असताना अनेकदा असे घडत नाही. यामुळे सगळेच एखादे पीक घेतात आणि यामुळे बाजारभाव पडतो. यामुळे मोठे नुकसान होते. सध्या उन्हाळ कांदा लागवडीसाठी सर्व गोष्टी पोषक ठरल्यामुळे शेतकऱ्यांनी कांदा लागवडीला पसंती दिल्याचे दिसत आहे. यामुळे कांद्याची मोठ्या प्रमाणावर लागवड झाली आहे. कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यात २१ जानेवारी अखेर ३ लाख ९५ हजार १५६ हेक्टरवर उन्हाळ कांदा लागवड झाली आहे. यामुळे यंदा मोठ्या प्रमाणवर कांदा बाजारात येण्याची शक्यता आहे. तसेच बाजारभाव देखील कसे असतील याचा अंदाज घेऊनच शेतकऱ्यांनी आता लागवड करणे गरजेचे आहे.

उन्हाळ कांदा लागवडीत उत्पादन आणि कांदा टिकवण क्षमता अशी आव्हाने निर्माण झाले आहे. अशा परिस्थितीत लागवड पद्धतीत बदल करणे, त्यामध्ये प्रामुख्याने क्षेत्र न वाढवता जमिनीची सुपीकता वाढवून उत्पादकता वाढीसाठी प्रयत्न करण्याची काळाची गरज आहे. जर दर्जा टिकला तरच कांदा बाजारात देखील टिकणार आहे. यामुळे याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. तसेच यामुळे उत्पादन आणि खर्च याचा देखील मेळ साधता येईल. हवामान बदलाचा मोठा फटका शेतकऱ्यांना सध्या बसत आहे. त्यामुळे अनेक भागांत कांद्यावर करपा, थ्रीप्स रोगांचा प्रादुर्भाव वाढल्याने सुरुवातीलाच पीक संरक्षण खर्च करावा लागत आहे. अनेकदा यावर औषधे मारावी लागत आहेत. यामुळे खर्च वाढणार आहे. याचा मेळ शेतकऱ्यांनी घालणे गरजेचे आहे.

सध्या लागवड करतानाच मोठा खर्च वाढला आहे. कांदा पिकाची गणिते ही उत्पादकता, मागणी व पुरवठा यावर अवलंबून आहेत. तसेच लागवड वाढल्याने अंदाज बांधणे गरजेचे आहे. सध्या साधारण २० ते २५ टक्के लागवडी वाढल्याने राज्याची विक्रमी कांदा लागवडीकडे वाटचाल सुरू आहे. यंदा चांगले पाऊसमान, मागील वर्षाच्या तुलनेत बियाण्यांची अधिक उपलब्धता आदी कारणांमुळे लागवड विक्रमी झाली आहे. अनेकदा लागवड वाढल्याने बियाणे कमी पडते, मात्र यावर्षी असे काही घडत नसल्याचे आतापर्यंत दिसून येत आहे.

दोन वर्षांपूर्वी बियाणे कमी पडल्याने आता घरगुती पातळीवर कांदा बियाणे शेतकऱ्यांनी मुबलक प्रमाणावर उपलब्ध केले आहे. त्यातच खरीप व लेट खरीप कांद्याचे नुकसान झाल्याने खर्च करून अपेक्षित एकरी उत्पादन हाती आलेले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी रब्बी हंगामातील कांद्याला पसंदी दिल्याचे चित्र आहे. यामुळे ही लागवड दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. यामुळे सध्या महाराष्ट्रानंतर मध्य प्रदेश, राजस्थान, बिहार या राज्यांतही लागवडी वाढत आहेत. यामुळे मजुरांची देखील मोठी टंचाई निर्माण झाली आहे. या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करूनच शेतकऱ्यांनी यंदा कांद्याची लागवड करावी.

English Summary: Farmers, read this news and then plant onions, the state's record onion cultivation
Published on: 29 January 2022, 11:32 IST