News

देशातील सर्वच शेतकऱ्यांना अनेक अडचणीचा सामना करावा लागतो, तसेच अनेक गोष्टींची माहिती नसल्याने किंवा योग्य मार्गदर्शन मिळत नसल्याने शेतकरी तोट्यात जातात, यामुळे अनेक शेतकरी आत्महत्या करतात. असे असताना झारखंड सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे.

Updated on 20 January, 2022 4:15 PM IST

देशातील सर्वच शेतकऱ्यांना अनेक अडचणीचा सामना करावा लागतो, तसेच अनेक गोष्टींची माहिती नसल्याने किंवा योग्य मार्गदर्शन मिळत नसल्याने शेतकरी तोट्यात जातात, यामुळे अनेक शेतकरी आत्महत्या करतात. असे असताना झारखंड सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. यामुळे आता शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. झारखंड सरकारने राज्यातील 30 लाख शेतकऱ्यांसाठी एक किसान कॉल सेंटर उभारण्यात आले आहे. या माध्यमातून शेतीशी संबंधित समस्यांवर उपाय शोधण्यासाठी शेतकरी फोन करु शकतात.

यामुळे आता शेतकऱ्यांचे प्रश्न सुटणार आहेत. सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 5 या वेळेत शेतकऱ्यांना कॉल सेंटर उपलब्ध होणार आहे. स्मार्ट फोन वापरणाऱ्या शेतकऱ्यांना व्हॉट्सअँप नंबरवर संपर्क साधता येणार आहे. यामुळे शेतकरी थेट आपली समस्या किंवा मार्गदर्शन हे मागू शकतात. झारखंडचे कृषीमंत्री बादल यांनी बुधवारी किसान कॉल सेंटरसुरू केले. रांची येथे त्याचे औपचारिक उद्घाटन केले आहे. शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी आता केवळ एक फोन आणि एक क्लिक एवढेच करावे लागणार असल्याचे बादल यांनी सांगितले. यामुळे आता तरी शेतकऱ्यांच्या अडचणी दूर होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

झारखंड येथील शेतकऱ्यांना 1800-123-1136 या टोल फ्री क्रमांकावर फोन करावा लागणार आहे. व्हॉट्सअँप नंबर 8797891222 देखील वापरता येईल. यामध्ये शेतकरी कोणत्याही अडचणी विचारू शकणार आहे. शेतीमध्ये वापरली जाणारी नवीन तंत्रे आणि इतर माहितीही येथून उपलब्ध होणार आहे. यासाठी kccjharkhand.in ही वेबसाइट देखील दिली आहे. यामुळे आता शेतकऱ्यांचे याकडे लक्ष लागले आहे. शेतकऱ्यांच्या समस्येवर झारखंड सरकारने तोडगा काढण्याचा प्रयत्न केला आहे.

असा प्रयोग महाराष्ट्र सरकारकडून होणे देखील गरजेचे आहे. सध्या सगळे जग मोबाईचा वापर करत आहे. प्रत्येकाकडे मोबाईल असल्याने त्याचा योग्य वापर होणेही गरजेचे आहे. यामुळे शेतकऱ्यांना आता मोबाइलचा पुरेपूर वापर करता येईल. अशाप्रकारे प्रयोग राबवणारे झारखंड हे कदाचित पहिलेच राज्य आहे. शेतकऱ्यांना शेतात असताना देखील थेट शेताच्या बांधावरून याचा फायदा घेता येणार आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या जीवनमानात बदल होईल, अशी आशा आहे.

English Summary: Farmers' questions will now be answered on a phone, a unique initiative has been started in the state.
Published on: 20 January 2022, 04:15 IST