News

Farmers Protest: गेल्या काही दिवसांपासून बाजारामध्ये कांदा कवडीमोल भावाने विकला जात. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी मेटाकुटीला आला आहे. साठवलेला उन्हाळी कांदा आता खराब होईल लागला आहे तरीही कांद्याला भाव मिळताना दिसत नाही. त्यामुळे आता अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आंदोलन सुरु केले आहे.

Updated on 28 September, 2022 12:38 PM IST

Farmers Protest: गेल्या काही दिवसांपासून बाजारामध्ये कांदा (Onion) कवडीमोल भावाने विकला जात. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी (Onion farmers) मेटाकुटीला आला आहे. साठवलेला उन्हाळी कांदा आता खराब होईल लागला आहे तरीही कांद्याला भाव मिळताना दिसत नाही. त्यामुळे आता अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आंदोलन सुरु केले आहे.

महाराष्ट्रातील (maharashtra) कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा प्रश्न संपताना दिसत नाही. पाच महिन्यांपासून कांद्याचे भाव निम्म्यावर आले आहेत. वारंवार आवाहन करूनही सरकारच्या मौनाने शेतकऱ्यांच्या संयमाचा बांध फुटला. कांद्याचा दर किमान 30 रुपये किलोपर्यंत वाढवावा, या मागणीसाठी शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू केले आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा (Srigonda) तालुक्यात शेतकरी उपोषणाला बसले आहेत. कांदा हे महाराष्ट्राचे प्रमुख पीक असल्याचे शेतकरी सांगतात. पण त्याची बाजारभाव एवढी कमी आहे की आपण खर्चही वसूल करू शकत नाही.

नवरात्रीत सोने खरेदी करण्याची सुवर्णसंधी! 10 ग्रॅम सोने 6671 रुपयांनी स्वस्त

यावर्षी कांदा लागवड (Onion planting) करणाऱ्या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. कांद्याच्या घसरलेल्या भावामुळे शेतकरी चिंतेत आहेतच, दुसरीकडे साठवलेला कांदाही सडत आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांचे दुहेरी नुकसान होत आहे. शासन व्यापाऱ्यांच्या पाठीशी उभे आहे, अन्यथा 18 रुपये किलोने केवळ 1 ते 8 रुपये भाव मिळत नाही, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

सरकारने शेतकऱ्यांची निराशा केली

शेतकऱ्यांच्या या गंभीर प्रश्नावर सरकारच्या मौनाविरोधात शेतकरी राज्यभरात उपोषण करणार आहेत. त्याची सुरुवात अहमदनगरपासून झाली आहे. महाराष्ट्र कांदा उत्पादक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भरत दिघोळे म्हणतात की, कांद्याचे दर सुधारण्यासाठी राज्यभर आंदोलन केले जाईल, तरच सरकारचे डोळे उघडतील. कांद्याला किमान 30 रुपये किलो भाव मिळावा, अशी आमची मागणी आहे.

पुढील ३ दिवस विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस! हवामान खात्याचा इशारा

कांद्याच्या घसरलेल्या भावामुळे शेतकरी किती दिवस तोटा सहन करू शकतो? त्यामुळे आता संयमाचा डोंगर तुटला आहे. जोपर्यंत सरकार मागण्या पूर्ण करत नाही तोपर्यंत हे आंदोलन थांबणार नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

सरकारने कांद्याला किमतीनुसार किमान आधारभूत किंमत (MSP) च्या कक्षेत आणावे किंवा त्याची किमान किंमत 30 रुपये जाहीर करावी. अहमदनगरच्या श्रीगोंदा तालुक्यात कांद्याचे बाजारभाव सुधारण्यासाठी शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. या आंदोलनात तालुक्यातील प्रमुख कांदा उत्पादक शेतकरी उपस्थित होते.

महत्वाच्या बातम्या:
महागाई भत्त्यापुर्वी केंद्र सरकारची कर्मचाऱ्यांना मोठी भेट! कर्मचाऱ्यांनी मानले आभार
कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये मोठी घसरण! नवरात्रीत पेट्रोल डिझेल दरात दिलासा मिळणार? जाणून घ्या दर

English Summary: Farmers Protest: Onion made the farmers cry! Farmers went on hunger strike
Published on: 28 September 2022, 12:38 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)