पुणे : गेल्या काही दिवसांपासून महावितरण आणि शेतकऱ्यांमध्ये मोठा वाद सुरू आहे. सध्या महावितरणकडे मोठी थकबाकी झाली आहे. यामध्ये पुणे प्रादेशिक विभागातील कृषिपंप वीज (agricultural pump) ग्राहकांची थकबाकी दिवसेंदिवस वाढत चालली आहे.
यामुळे महावितरणकडून शेतकऱ्यांपुढे अनेक योजना ठेवल्या जात आहेत. यामध्ये थकबाकी वसुलीसाठी राज्य सरकारने नविन कृषिपंप धोरण 2020 तयार केले आहे. या माध्यमातून 31 मार्च 2023 पर्यंत थकबाकी भरणाऱ्या ग्राहकांना थकबाकीवर 30 टक्के सूट देण्यात येणार आहे.
यामुळे ही एक चांगली संधी शेतकऱ्यांपुढे आहे. तसेच विलंब आकार व व्याज माफ करण्यात येत आहे. यामुळे आता तरी शेतकऱ्यांनी पैसे भरावेत, असे आवाहन करण्यात आले आहे. पुणे प्रादेशिक विभागाचे (Mahavitaran) संचालक अंकुश नाळे यांनी याबाबत माहिती दिली.
शिंदे सरकारने शब्द पाळला! नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांसाठी घेतला मोठा निर्णय
डिसेंबर 2022 अखेरपर्यंत महावितरण पुणे प्रादेशिक विभागात कृषिपंप वीज ग्राहकांची थकबाकी 12 हजार 61 कोटी झाली आहे. जानेवारी 2021 ते मार्च 2022 पर्यंत यावर 50 टक्के सूट देण्यात आली होती.
मातीची जैविक क्षमता टिकवणे आज महत्त्वाचे
एप्रिल 2022 ते 31 मार्च 2023 पर्यंत या योजनेवर 30 टक्के सूट देण्यात येणार आहे. विलंब आकार व व्याज पूर्णतः माफ करण्यात येत आहे. यामुळे शेतकऱ्यांना यामध्ये दिलासा देण्याचा महावितरणचा प्रयत्न आहे.
महत्वाच्या बातम्या;
शेतकऱ्यांनो कृषी यांत्रिकीकरण ही काळाची गरज
नोकरीला रामराम करत स्ट्रॉबेरीची लागवड! प्रयोगशील शेतकऱ्याची यशोगाथा
बारामतीमध्ये आजपासून कृषी प्रदर्शनास सुरुवात, कृषिमंत्र्यांसह अजित पवार राहणार उपस्थित
Published on: 19 January 2023, 11:22 IST