News

संत्रा उत्पादक शेतकऱ्यांनी संत्रा बाग हाताच्या तळहाताप्रमाणे जपल्या आहेत. तसंच बागेला हेक्टरी लाखो रुपये खर्च केला आहे. पण सध्या फळगळती सुरु झाल्याने शेतकरी चिंतेत सापडले आहेत.

Updated on 01 September, 2023 1:20 PM IST

अमरावती 

अमरावती जिल्ह्यातील वरुड, मोर्शी, चांदूरबाजार तालुक्यात मोठ्या प्रमाणावर संत्राचे उत्पादन घेतलं जाते. विदर्भामध्ये तब्बल ९८ लाख हेक्टरवर संत्र्याच्या बागा आहे. परंतु संत्रा उत्पादक शेतकरी आता फळगळीतीमुळे मेटाकुटीला आले आहेत. 

संत्रा उत्पादक शेतकऱ्यांनी संत्रा बाग हाताच्या तळहाताप्रमाणे जपल्या आहेत. तसंच बागेला हेक्टरी लाखो रुपये खर्च केला आहे. पण सध्या फळगळती सुरु झाल्याने शेतकरी चिंतेत सापडले आहेत. एकीकडे शेतकरी अडचणीत सापडले असताना दुसरीकडे कृषी विभाग मात्र याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप येथिल शेतकऱ्यांनी केला आहे.

फळगळती रोखण्यासाठी शेतकऱ्यांनी अनेक उपाययोजना केल्या आहेत. औषध फवारणी देखील केली आहे. मात्र कृषी विभाग याकडे संपूर्ण पणे दुर्लक्ष करत आहे. तसंच कृषी विभागाकडून कोणत्याही प्रकारचे मार्गदर्शन केले जात नाही. किंवा कोणताही कृषी अधिकारी आमच्या बागेची पाहणी करायला येत नाही, असा आरोपही या भागातील शेतकरी करत आहेत.

फळगळतीमुळे शेतकरी अडचणीत येऊ लागले आहेत. बागांसाठी लाखो रुपये खर्च केला आहे. पण हंगामापूर्वीच बागांचे नुकसान होत आहे. त्यामुळे यंदा बागायतदारांना फटका बसण्याची शक्यता आहे. यामुळे संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना सरकारने ठोस मदत जाहीर करावी, अशी मागणीही या भागातून जोर धरु लागली आहे.

दरम्यान, संत्राच्या फळगळतीबाबत कृषी विभागाने ठोस उपाययोजना सांगाव्यात. जसे कपाशीवर उपाय आले. तसे उपाय संत्रा फळगळतीबाबत देखील सांगितले तर शेतकरी तसे उपाय करतील. जेणेकरुन फळगळतीमुळे होणारे नुकसान टाळता येईल, अशी मागणी शेतकरी या भागातून करत आहेत.

English Summary: Farmers panic due to orange fruit drop in Ambia spring
Published on: 11 August 2023, 04:53 IST