1. बातम्या

कृषी कायद्याविरोधात सात राज्यातील शेतकरी ररत्यावर

KJ Staff
KJ Staff


केंद्र सरकारच्या कृषी विधेयकांना विरोध करत शुक्रवारी पंजाब, हरियाणासह, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बिहार, महाराष्ट्र आणि कर्नाटकातील ३१ पेक्षाही अधिक शेतकरी संघटांनी भारतीय किसान संघर्ष समन्यय समिती आणि भारतीय किसान युनियनच्या नेतृत्वाखाली आंदोलने केले. शेतकऱ्यांनी विविध ठिकाणांर रास्ता, रेल रोको, आंदोलन केले. पंजाबमध्ये शेतकऱ्यांनी थेट रेल्वे रुळावर ठिय्या दिला. महाराष्ट्रातह ठिकठिकाणी आंदोलने करण्यात आली.

कृषी विधेयकांविरोधात पंजाब आणि हरियाणात आंदोलनाचा धड जास्त होती. शुक्रवारी सकाळपासूनच शेतकऱ्यांसह कँग्रेस, आप आणि शिरोमणी अकाली दलाने रस्त्यावर उतरत तीव्र आंदोलन केले. यावेळी शेतकऱ्यांनी ठिकठिकाणी रास्ता रोको, रेल रोको ठिय्या आंदोलन केले. काही ठिकाणी शेतकऱ्यांना रोखण्यासाठी पोलिसांना बळाचा वापर करावा लागला. भारतीय किसान युनियन क्रांतिकारी, किर्ती किसान युनियन, भारतीय किसान युनियन, किसान मजदूर संघर्ष समिती आणि बीकेयू या संघटनांनी आंदोलनास पाठिंबा दिला होता. पंजाबमध्ये अनेक ठिकाणांवर रास्ता रोको आंदोलन केले.

दरम्यान अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समिती व किसान युनियनच्या भारत बंद हाकेला साद घालत स्वाभामानी शेतकरी संघटनेने यात आपला सहभाग नोंदवला होता. राज्यातील कोल्हापुरात झालेल्या आंदोलनात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, माजी खासदार राजू शेट्टी यांनी सकाळी त्यांच्या घरासमोर कृषी विधेयकाची होळी केली. तसेच सरकारने हे विधेयक मागे घ्यावे, अशी मागणी यावेली केली. दरम्यान शेतकरीस शेतमजूर , मच्छीमार, फळबागायत शेतकरी या सर्वांना एकत्रित करुन दक्षिण भारतातील चळवळ मजबूत करण्यासाठी राष्ट्र सेवा दलाचे अध्यक्ष भाषा तज्ञ गणेश देवी यांनी शेट्टी यांची भेट घेत, आंदोलनाला पाठिंबा दिला.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters