News

पैनगंगा नदिकाठच्या शेतक-यांचे कायमस्वरुपी नुकसान टाळण्यासाठी येऴगाव धरणाला सांडवा तयार करा

Updated on 24 September, 2022 12:21 PM IST

पैनगंगा नदिकाठच्या शेतक-यांचे कायमस्वरुपी नुकसान टाळण्यासाठी येऴगाव धरणाला सांडवा तयार करा चिखली-बुलढाणा येथील येळगावचे धरण यापुर्वीच १००%भरले आहे.आणि त्यातच दि१८-१९सप्टेंबर रोजी बुलढाणा येथे पडलेल्या मुसळधार पावसामुळे येळगाव धरणाचे स्वयंचलीत गेट अचानक खुलल्याने पैनगंगा नदिकाठच्या शेतक-यांचे शेतीपीकाचे यावर्षी सुद्धा थोड्या प्रमाणात नुकसान झाल्याने पैनगंगा नदिकाठच्या शेतक-यांच्या शेतीपीकाचे तात्काळ पंचनामे करण्यात यावे,नुकसानग्रस्त शेतक-यांना

८सप्टेंबरच्या शासन निर्णयानुसार नुकसान भरपाई देण्यात यावी,According to the government decision of 8th September, compensation should be given.

हे ही वाचा - कापूस दरवाढ रोखण्याचा दबाव केंद्राने झुगारला, असा राहील शेतकऱ्यांच्या कापसाला दर

पैनगंगा नदिकाठच्या शेतक-यांचे कायमस्वरुपी नुकसान टाळण्यासाठी येळगाव धरणातील ५गेट काढुन सांडवा तयार करण्यात यावा,यासह आदि मागण्या शेतक-यांसह स्वाभिमानी चे विनायक सरनाईक,भगवानराव मोरे यांनी तहसिलदार व तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे दि२१सप्टेंबर रोजी केली आहे.तर मागण्यांची पुर्तता न झाल्यास तिव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शेतक-यांनी दिला आहे.

जेव्हापासुन येळगाव धरणाचा सांडवा बंद करुण त्या सांडव्यामध्ये ८०स्वयंचलीत गेट बसवले आहेत. तेव्हा पासुन दरवर्षी बुलढाणा,चिखली,मेहकर तालुक्यातील पैनगंगा नदिकाठच्या शेतक-यांच्या सोयाबीन व इतर शेतीपीकाचे मोठे नुकसान होत आहे. मागील वर्षीच्या अशाच महापुराने नदिकाठावरील शेतक-यांचे १००% झाल्याने यावर्षी धरण ओव्हर फ्लो होऊन स्वयंचलीत गेट एकाचवेळी पाण्याच्या दबावामुळे खुले नये,यासाठी ४ते५गेट खुले

ठेवुन पाण्याचा विसर्ग नदिमधे सुरु ठेवण्यात यावा,अशी मागणी जिल्हाधिकारी बुलढाणा,मुख्याधिकारी बुलढाणा यांच्याकडे शेतक-यांनी केली होती.तर शेतीपीकाचे नुकसान झाल्यास शासन जबाबदार राहिल असे सुद्धा अवगत केले होते. तर मध्यंतरी आलेल्या पावसामुळे व नपाने यावर लक्ष केंद्रीत केल्याने ब-यापैकी शेतीपीकाचे नुकसान टळले होते.परंतु बुलढाणा येथे दि१७ते१८सप्टेंबर रोजी पडलेल्या पावसामुळे येळगाव धरणामधे पाणीसाठा जास्तीचा झाल्याने स्वयंचलीत गेट एकाचवेळी उघडल्याने धरणातुन

मोठा विसर्ग पैनगंगा नदित आल्याने व इतर नद्याचे पाणी नदिपात्रात आल्याने पुर परीस्थीती निर्माण होऊन शेतात पाणी आल्याने चिखली तालुक्यातील नदिकाठच्या शेतक-यांच्या पिकाची नासाडी झाली आहे.तर सद्या परीस्थीतीत पाणी साचले आहे.याबाबतची माहिती मिळाल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विनायक सरनाईक यांनी शेतक-यांसह नदिकाठच्या शेताची पाहणी केली नुकसान दिसुन आल्याने दि२१सप्टेंबर रोजी सरनाईक यांनी शेतक-यांसह चिखली तहसिलदार,व तालुका कृषी

अधिकारी यांची भेट घेऊन पुराच्या पावसाने झालेल्या सोयाबीन,उडीद,मुंग व इतर पिकाचे पंचनामे तातडीने करण्यात यावे,८सप्टेंबर च्या वाढिव मदतीच्या शासन निर्णयानुसार शेतीपीकाचे नुकसान झालेल्या शेतक-यांना नुकसान भरपाई देण्यात यावी,वारंवार येळगाव धरणाच्या पाण्यासाठी उपाययोजना करण्याचे सांगुनही शेतक-यांच्या मागणीकडे दुर्लक्ष करणा-या सबंधीत दोषीचा

अहवाल वरीष्ठांकडे पाठवण्यात यावा,येळगाव धरणाच्या सांडवा बंद करुण अनाधिकृत टाकलेले ८०गेटमुळे शेतक-यांचे होणार नुकसान कायमस्वरुपी टाळण्यासाठी धरणाचे ५ते१०गेट काढुन सांडवा तयार करण्यात यावा,येळगाव धरणाच्या गेट संदर्भात जिल्हाधिकारी यांच्याकडे बैठक लावुन समस्या कायम स्वरुपी सोडवण्यात यावी,यासह आदि मागण्या करण्यात आल्या आहेत.मागण्यांची पुर्तता न

झाल्यास तिव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.यावेळी विनायक सरनाईक,भगवानराव मोरे,सखाराम भुतेकर,फिरोज खाण,सतिष सुरडकर, प्रल्हाद देव्हडे, रामेश्वर चिकणे,संजय हाडे,परसराम भुतेकर,तुकाराम होगे,भगवान देव्हडे,शिवशंकर माने, उमेश सुरडकर,प्रकाश पवार,विष्णु हाडे,दत्तात्रय करवंदे,उत्तम करवंदे,विठ्ठल वसु,नारायण भुसारी यांच्यासह असंख्य शेतकरी उपस्थीत होते

English Summary: Farmers of Panganga River loss of crops due to flood water; Panchnama Karun demands Swabhimani compensation
Published on: 23 September 2022, 06:44 IST