चंद्रपूर जिल्ह्यामध्ये गोदपिंपरी तालुक्यात एक सकमुर नावाचे गाव नदी काठी वसले आहे. सकमुर गावातील लोकांना नेहमीच वन्यप्राण्यांची भीती असते. तसेच गावातील लोकांना वर्धा नदी ही एक वरदान च ठरलेली आहे मात्र कधी नदीला पूर आला की शेतीमालाची बिकट अवस्था होते. जे की शेतीचे हे नुकसान पाहता गावातील लोक आता शेतीला पूरक व्यवसाय असण्याकडे ओळले आहेत. गावामधील जवळपास 25 शेतकरी सध्या आपल्या शेतमळ्यात मस्त्यपालन करत आहेत.
आठवड्यातून चार दिवस पकडतात मासे :-
शेतमळ्यात ताजे मासे असल्यामुळे या माश्यांना मोठ्या प्रमाणात मागणी असते त्यामुळे शेतकरी यामधून मोठ्या प्रमाणावर पैसे कमवतात. ताजे व चविष्ट मासे असल्यामुळे नागरिकांची मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. शहरातील लोकांची मागणी पाहता अगदी दूरवरचे विक्रेते सकमुर गावात येत आहेत. पप्रति आठवड्यातून चार दिवस शेतमळ्यात मासे पकडले जातात.
शेततळ्यांनी उंचावला आर्थिक स्तर :-
मागील चार दिवसात जवळपास सात ते आठ क्विंटल मासे विकले गेले आहेत. जे की या गावातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर शेतीप्रयोग केले आहेत. परंतु निसर्गाच्या लहरीपणामुळे या शेतकरयांच्या वाट्याला निराशा आलेली आहे.
शेती काही भरोश्याची नाही :-
सध्याच्या काळात शेती करणे म्हणणे बेभरोसे आहे हे नेहमी आपण ऐकत असतो जे की हे खरच आहे. दुष्काळ, अतिवृष्टी तसेच नापीक यामुळे बळीराजा पूर्णपणे संकटात अडकलेला आहे. मोठ्या आशेने बळीराजा शेती करतोय तसेच कर्ज काढतोय मात्र शेतीमधून उत्पन्न निघाले नाही की बळीराजा खचतोय.
हेही वाचा:-राज्यातील या भागात केळी बागांमध्ये ‘कुकुंबर मोझॅक’ रोगाचे थैमान, वाचा सविस्तर
कणखर बाणा काही खचत नाही :-
जरी शेतीवर अनेक संकटे आली तरी शेतकरी राजा आजिबात मागे वळून बघत नाही असे अनेक शेतकरी आहेत आणि त्यामधील उदाहरण म्हणजे सकमुर गावातील शेतकरी हे वाक्य गावातील प्रयोगशील शेतकरी गजानन काळे यांनी सांगितले आहे. तेथील स्थानिक तसेच घाऊक विक्रेत्यांना सुदधा चांगल्या दरात मासे मिळतात.
Published on: 15 September 2022, 04:53 IST