आपण बघतो की शेतातील अनेक गोष्टी या चोरीला जात असतात. मोटर, वायर किंवा शेतीचे इतर साहित्य देखील चोरीला जात असते. आता मात्र चोरटयांनी चक्क चालू विद्युत डीपी चोरून नेला आहे. यामुळे याची चर्चा सध्या सुरु आहे. औरंगाबादच्या वैजापूर तालुक्यात ही घटना घडली आहे. यामुळे आता या शेतकऱ्यांना अंधारातच रात्र काढावी लागत आहे.
वैजापूर तालुक्यातील घायगावात काल रात्री चोरट्यांनी शेतातील 'विद्युत डीपी'वर डल्ला मारला. मध्यरात्रीच्या सुमारास आलेल्या चोरट्यांनी चक्क चालू विद्युत डीपी बंद करून तिला खाली उतरवत तिच्यातील महत्वाच्या वस्तू सोबत घेऊन गेले. डीपीचा वरील भाग जागेवरून सोडून त्यातील महत्वाचे धातू चोरट्यांनी चोरले आहे.
सकाळी शेतकरी आल्यावर या घटनेचा खुलासा झाला आहे. गावकऱ्यांनी याबाबतची माहिती पोलिसांना आणि संबधित प्रशासनाला दिली आहे. यामुळे आता पोलीस चोरांचा शोध घेत आहेत. या विद्युत डीपीवर 70 ते 80 शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन आहे. त्यामुळे आता विद्युत डीपी नसल्याने शेतकऱ्यांनी पिकांना पाणी कसे द्यावे असा प्रश्न त्यांना पडला आहे.
आता महाराष्ट्राला वीज खरेदी करता येणार नाही!! 5000 कोटी थकवल्याने कारवाई
याबाबत सरपंच हरिदास साळुंके यांनी माहिती दिली. या चोरट्यांनी चक्क चालू विद्युत डीपी खोलून चोरी केली आहे. त्यामुळे गावात आणि परिसरात या चोरीची जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. लाईटीबाबत आपण काही काम असल्यास वायरमन बोलवतो, मात्र चोरटयांनी ही चालू डीपी कशी सोडवली असा प्रश्न अनेक शेतकऱ्यांना पडला आहे.
शेतकऱ्यांच्या जमिनीतील काळ सोनं!! शेतकऱ्यांनो काळ्या जमिनीत घ्या 'ही' पिके...
विद्युत डीपीमध्ये अनेक धातू असतात, ज्यात तांब्याच्या धातूचा प्रमाण अधिक असते. बाजारात तांब्याच्या धातूची किमंत अधिक आहे. एका विद्युत डीपीमध्ये तब्बल 50 हजारांचा तांब्याच्या कॉईल असतात. यामुळे चोरटयांनी आपला मोर्चा या धातुकडे वळवला आहे.
महत्वाच्या बातम्या;
काळजी मिटली! मंकीपॉक्स चाचणीसाठी पहिले स्वदेशी किट लाँच..
हा चिखल पायाला काय, अख्ख्या अंगाला लागला तरी झटकला जात नाही कारण..
झुकेगा नही साला!! दीड कोटीचे घर आले महामार्गाच्या वाटेत, शेतकऱ्याने ते मागे सरकवले पण पाडले नाही..
Published on: 21 August 2022, 03:45 IST