News

भारत हा कृषीप्रधान देश आहे आणि शेतकरी कृषीप्रधान देशाचा कणा आहे. त्यामुळे देशातील शेतकऱ्यांसाठी मायबाप शासन वेगवेगळ्या योजना (Government Scheme) कार्यान्वित करत असते. देशातील अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी (Farmer) सरकार दरबारी अनेक योजना राबविल्या जात असतात.

Updated on 16 March, 2022 12:13 PM IST

भारत हा कृषीप्रधान देश आहे आणि शेतकरी कृषीप्रधान देशाचा कणा आहे. त्यामुळे देशातील शेतकऱ्यांसाठी मायबाप शासन वेगवेगळ्या योजना (Government Scheme) कार्यान्वित करत असते. देशातील अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी (Farmer) सरकार दरबारी अनेक योजना राबविल्या जात असतात.

या योजना राबविण्याचे उद्दिष्ट शेतकरी बांधवांचे जीवनमान उंचावणे तसेच त्यांना आर्थिक सुबत्ता प्राप्त करून देणे हे असते. अशाच योजनेपैकी एक आहे केसीसी आता किसान क्रेडिट कार्डधारक व्यक्तींना 1 लाख 60 हजार रुपयांपर्यंतचे कर्ज दिले जाणार आहे. जर शेतकरी बांधवांनी 1 लाख कर्ज घेतले तर त्यासाठी त्यांना काहीच कारण द्यावे लागणार नाही.

मित्रांनो आम्ही आपणास सांगू इच्छितो की, केंद्र सरकारने अल्पभूधारक शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी केसीसी अर्थात किसान क्रेडिट कार्ड ही योजना राबवली होती. आता या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना एक लाख रुपयांपर्यंतचे विनातारण कर्ज दिले जाणार आहे. यामुळे शेतकरी बांधवांना वेळेवर कर्जाची सोय होणार असल्याचे सांगितले जात आहे.

अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी यामुळे सहजरीत्या भांडवल उपलब्ध होईल असे देखील सांगितले जात आहे. शेतकरी बांधवांना आम्ही आपणास सांगू इच्छितो की या योजनेअंतर्गत एक लाख रुपयापर्यंत कर्ज घेण्यासाठी काहीच तारण ठेवावे लागतं नाही. मात्र 1 लाख रुपयापेक्षा जास्त कर्ज हवे असल्यास गॅरंटी द्यावी लागणार आहे.

महत्वाची बातमी:-आनंदाची बातमी! शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकरच जमा होणार 50 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे नेमकं प्रकरण

या योजनेअंतर्गत कर्ज मिळाल्यानंतर शेतकऱ्यांनी वेळेवर पैसे भरल्यास शेतकऱ्यांना 4 टक्के व्याजदराने 3 लाख रुपयांच्या कर्जाचा लाभही मिळणार आहे. कर्जासाठी बँकेत अर्ज सादर केल्यानंतर 15 दिवसाच्या आत शेतकऱ्यांना या कर्जाचा लाभ मिळणार आहे. याशिवाय, किसान क्रेडिट कार्डवर आकारण्यात येणारे सर्व बँकांचे प्रोसेसिंग शुल्कही सरकारने काढून टाकले आहे.

Good News! नांदेड जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला नाम फाउंडेशनकडून मदत; जाणुन घ्या नामचे लई भारी काम

आवश्यक कागदपत्रे

»शेतकऱ्याकडे शेतीयोग्य जमीन असावी. अर्थातच शेतकऱ्याच्या नावावर सातबारा असावा 

»अर्जदाराचे आधार कार्ड

»शेतकरी भारतीय रहिवासी असणे आवश्यक आहे

»जमिनीची प्रत

»पॅन कार्ड

»मोबाईल नंबर

»पासपोर्ट आकाराचा फोटो

महत्वाची बातमी:-महत्वाची बातमी: 'या' महिलांना दिले जाते पेन्शन दरमहा मिळते एवढे पेन्शन

कसा आणि कुठं करणार अर्ज

शेतकरी मित्रांनो जर आपणास या योजनेअंतर्गत कर्ज प्राप्त करायचे असेल तर आपणास सर्व प्रथम पीएम किसान सन्मान निधी या योजनेच्या अधिकृत वेबसाइटवर भेट द्यावी लागेल. वेबसाईटवर गेल्यानंतर तिथे आपणास डाउनलोड केसीसी फॉर्म पीडीएफ या पर्यायावर क्लिक करावे लागणार आहे. येथून तुम्ही एप्लीकेशन फॉर्म डाऊनलोड करू शकता.

एप्लीकेशन फॉर्म डाऊनलोड केल्यानंतर आपणास त्याची झेरॉक्स अर्थात हार्ड कॉपी तयार करून घ्यावी लागेल. त्यानंतर हा फॉर्म सुयोग्य भरून ज्या बँकेत आपले खाते खोलले आहे त्या बँकेत जमा करावा लागणार आहे.

महत्वाची बातमी:- आनंदाची बातमी! कर्जमाफी झालेल्या शेतकऱ्यांना आता नव्याने कर्ज देण्यासाठी बँकांना सूचना केल्या जाणार- अजित पवार

English Summary: farmers now get 1 lakh and 60 thousand rupees as a loan learn more about it
Published on: 16 March 2022, 12:13 IST