शेतकरी सध्या अनेक संकटांचा सामना करत आहेत. अवकाळी विजतोडणी यामुळे ते आर्थिक संकटात सापडले आहेत. असे असताना आता त्यांच्यासाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. यावर्षी (Rabi Season) रब्बी हंगामात हरभऱ्याचे क्षेत्र हे दुपटीने वाढले आहे. शिवाय पोषक वातावरणामुळे उत्पदनात वाढही झालेली आहे. यामुळे शेतकरी आनंदात आहेत. सध्या वाढत्या उत्पादनामुळे खुल्या बाजारपेठेत (Chickpea Crop) हरभऱ्याचे दर स्थिर आहेत.
सध्या नाफेडने एक चांगला निर्णय घेतला आहे. सध्या खुल्या बाजारपेठेत 4 हजार 500 असा सरासरी दर आहे. नाफेडने (Chickpea Crop) हरभऱ्यासाठी खरेदी केंद्रावर 5 हजार 230 रुपये प्रति क्विंटलची घोषणा केली आहे. खरेदी केंद्राला सुरवात कधी याची चिंता शेतकऱ्यांना लागली होती. पण अमरावती जिल्ह्यात हरभरा खरेदी केंद्राला सुरवात झाली आहे. यामुळे आता शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
याबाबत माजी आमदार वीरेंद्र जगताप यांच्या उपस्थितीमध्ये ही सुरवात झाली आहे. शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. आता आवक वाढली तरी त्याचा दरावर परिणाम होणार नाही. मात्र, यासाठी देखील विक्रीपूर्वीची नोंदणी गरजेची आहे. खरेदी केंद्रावर 5 हजार 230 रुपये हा दर ठरवून देण्यात आला आहे. त्यामुळे बाजारपेठेतील दर आणि वाढणारी आवक यामुळे खऱ्या अर्थाने गरज होती ती हमीभाव केंद्राची. असे असताना ही खरेदी केंद्र सुरु झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
यासाठी काही गोष्टी आवश्यक आहेत. खरेदी केंद्रावर शेतीमालाची विक्री करण्यासाठी पिकपेऱ्यावर त्या पीकाची नोंदणी असणे गरजेचे आहे. याकरिता शेतकऱ्यांनी ‘ई-पीक पाहणी’ च्य माध्यमातून ही प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे. शेतकऱ्यांना सहकारी खरेदी विक्री संघ येथे आधार कार्ड, सातबारा, 8 अ उतारा, तलाठ्यांच्या स्वाक्षरीचा पीक पेरा उतारा असणे गरजेचे आहे. तसेच आधार लिंक असलेले बँक पासबुकची झेरॉक्स ही कागदपत्रे जमा करावी लागणार आहेत. या गोष्टी तयार असतील तर याचा लाभ घेता येणार आहे.
Published on: 06 March 2022, 03:27 IST