News

देशातील शेतकरी व्यापारीक पिके घेत आहेत. व्यापारिक पिकांचे क्षेत्र वाढू लागले आहे. पण निती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत यांनी आपल्या वेगळं मत मांडले आहे. ज्या पिकांना कमी पाणी लागेल अशा पिकांची पेरणी शेतकऱ्यांनी केली हवी असे मत त्यांनी मांडले आहे.

Updated on 27 July, 2020 6:33 PM IST


देशातील शेतकरी व्यापारीक पिके घेत आहेत. व्यापारिक पिकांचे क्षेत्र वाढू लागले आहे. पण निती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत यांनी आपल्या वेगळं मत मांडले आहे. ज्या पिकांना कमी पाणी लागेल अशा पिकांची पेरणी शेतकऱ्यांनी केली हवी असे मत त्यांनी मांडले आहे. यामुळे शेतकऱ्यांनी धानचे पीक घेण्याऐवजी बाजरीचे उत्पन्न घ्यावे असे कांत म्हणाले. बाजरीमध्ये अनेक पोषक तत्वे आणि सुक्ष्म पोषक तत्व असतात, ज्यात प्रोटिन आणि कॅल्शिअमचे प्रमाण अधिक असते. यामुळे महिलांना आणि लहान मुलांसाठी सुरक्षा कवच योजनेत समाविष्ट केले पाहिजे, असे कांत म्हणाले

ट्विट करत निती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत यांनी बाजरी विषयी ही माहिती दिली. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, बाजरी विषयी राज्यांशी झालेली चर्चा सकारात्मक राहिली. यात प्रोटीन आणि कॅल्शिअमसह सूक्ष्म पोषक तत्वे आढळून येतात.  कांत प्रमोशन ऑन नॅशनल कन्सलटेशन ऑन मिल्ट्स वर झालेल्या व्हर्च्युल  बैठकीचे अध्यक्ष होते. या बैठकीत राज्यांमधील प्रतिनिधींनी आपले अनुभव सांगितले. यासह देशाच्या चालना देण्याच्या योजनांमध्ये   बाजरीचा समावेश करण्याच्या संभाव्य मार्गावर चर्चा केली. 

खरीप हंगामात बाजरीचे उत्पन्न घेतले जाते. बाजरीचे मोठे दाने असलेल्या पिकांमध्ये गणले जाते. भारतात बाजरीचे शेती राजस्थान, महाराष्ट्र, गुजरात मध्य सर्वात जास्त घेतले जाते. यासह इतर राज्यातही बाजरीची शेती केली जाते. बाजरीच्या शेतीला कमी मेहनत लागते, मेहनत कमी लागत असल्याने शेतकऱ्यांचा होणारा खर्च वाचतो आणि शेतकऱ्यांना उत्पन्न अधिक मिळत असते. उष्ण प्रदेशात बाजरीचे पीक घेतले जाते. बाजरीला जास्त पाण्याची गरज राहत नाही. बाजरीचे पीक पावसावर अवलंबून असते.

English Summary: Farmers! No more, just sow millet in the field - Niti Commission
Published on: 27 July 2020, 06:32 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)