News

आज आंदोलक शेतकऱ्यांनी देशभर ‘चक्का जाम’ची हाक दिली आहे. पण राजधानी दिल्लीला या आंदोलनातून वगळण्यात आले असून, देशभरात तीन तास आंदोलन केले जाणार आहे.

Updated on 06 February, 2021 11:49 AM IST

आज आंदोलक शेतकऱ्यांनी देशभर ‘चक्का जाम’ची हाक दिली आहे. पण राजधानी दिल्लीला या आंदोलनातून वगळण्यात आले असून, देशभरात तीन तास आंदोलन केले जाणार आहे. दरम्यान राज्यात महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांनी शेतकऱ्यांच्या आंदोलनला पाठिंबा दिला आहे.

कृषी संयुक्त किसान मोर्चाने याबद्दल शुक्रवारी माहिती दिली. राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्गांवर आंदोलन केले जाणार असून, कोणत्या वाहनांना जाण्यास मूभा दिली जाईल, याबद्दलही मोर्चाने स्पष्ट केले आहे.

देशभर राष्ट्रीय महामार्ग आणि राज्य महामार्गावर आज (६ फेब्रुवारी) दुपारी चक्का जाम आंदोलन केले जाणार आहे. दिल्ली वगळता देशात इतरत्र तीन तास चक्का जाम करण्यात येणार आहे. या आंदोलनाच्या काळात शाळेच्या बस, रुग्णवाहिका आदी अत्यावश्यक सेवांच्या वाहनांना वगळण्यात आलेले आहे. किसान मोर्चाने ही माहिती दिली आहे. ‘चक्का जाम’च्या पार्श्वभूमीवर दिल्लीच्या सीमांवर आंदोलन सुरू असलेल्या ठिकाणी खबरदारीचा उपाय म्हणून सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

 

मोठा फौजफाटा तैनात करण्याबरोबरच रस्तेही बंद करण्यात आले आहेत. दरम्यान, चक्का जाम आंदोलन नसून, भारत बंद असल्याच्या अफवाही सोशल मीडियातून पसरवल्या जात असल्याचे समोर आले आहे.शनिवारी १२ ते ३ या वेळेत चक्का जाम आंदोलन केले जाणार आहे.उत्तर प्रदेश, दिल्ली-एनसीआर आणि उत्तराखंडमध्ये चक्का जाम आंदोलन केले जाणार नाही. 

उर्वरित देशभरात आंदोलन होणार असून, अत्यावश्यक सेवेतील आणि शाळेच्या बस व रुग्णवाहिकांना जाऊ देण्याचे निर्देश संयुक्त मोर्चाने आंदोलकांना दिले आहेत.

English Summary: Farmers' Movement: 'Chakka Jam' across the country today; Three states were excluded from the agitation
Published on: 06 February 2021, 10:02 IST