दिवाळीनंतर 16 नोव्हेंबरला सोलापुरमध्ये शेतकरी मेळावा होणार आहे. माढा लोकसभा मतदारसंघातील कापसेवाडीत हा मेळावा होणार आहे, या मेळाव्याला शरद पवार उपस्थित राहणार आहेत. सध्या सोलापूर, उस्मानाबाद आणि सांगली या तिन्ही जिल्ह्यात बेदाणा, दूध आणि टॉमॅटो उत्पादक शेतकरी अडचणी सापडले आहेत.
बेदाण्यावरील निर्यात शुल्क कमी करुन आयात शुल्क वाढवण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. सध्या राज्यात 94 हजार टन बेदाणा योग्य भाव मिळत नसल्याने कोल्ड स्टोरेजमध्ये पडून आहे.वाय बी चव्हाण सेंटर मुंबईत येथे द्राक्ष उत्पादक शेतकरी नितीन बापू कापसे यांच्यासह काही शेतकऱ्यांनी शरद पवार यांची भेट घेतली. त्यानंतर शरद पवार यांनी कापसेवाडी येथील मेळाव्याला येण्याचं मान्य केल्याची माहिती नितीन बापू कापसे यांनी दिली आहे.
सध्या वाढलेले टॉमेटोचे दरही कमी झाले आहेत तसेच दुध उत्पादकही दर कमी झाल्याने शेतकऱ्यांच्यी अडचणीत वाढ झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी शरद पवार कापसेवाडीत येणार आहेत, अशी माहिती नितीन कापसे यांनी दिली.
Published on: 03 November 2023, 06:15 IST