फळबागेत आच्छादनाचा वापर केल्यामुळे बाष्पीभवनाचा वेग कमी करता येतो त्यामुळे जमिनीतील ओलावा टिकवून राहण्यास मदत होते. खोडांना बोडोंपेस्ट लावावी. फळझाडांना ठिबक सिंचनाने पाणी द्यावे, वाढते तापमान, गरम वारे, कोरडी हवा याचा विपरीत परिणाम नवीन लावलेल्या फळझाडांवर तसेच फळे देणाऱ्या झाडांवर होत असतो. यामुळे मुख्यत्वे कोवळी फूट करपणे, खोड तडकणे, फळगळ होणे, फळांचा आकार लहान होणे, सर्व पाने, फळे गळून झाडे वाळून जाणे, झाडांची वाढ थांबणे, शेवटी झाड मरणे असे प्रकार होतात याकरिता पाणी आणि उपलब्ध साधनांचा कार्यक्षम वापर करणे आवश्यक आहे.
पाण्याचा कार्यक्षम वापर :
ठिबक सिंचन, भूमिगत सिंचन पद्धतीने थेट फळझाडांच्या मुळापाशी गरजेनुसार पाणी द्यावे. प्रचलित पद्धतीपेक्षा ५० ते ६० टक्के पाण्याची बचत होवून उत्पादनात १० ते १५ टक्के वाढ मिळू शकते.
या पद्धतीमुळे झाडांच्या गरजेनुसार पाणी मोजून देता येते. पाण्याचा अपव्यय होत नाही. पाण्याबरोबर खते देता येतात, त्यामुळे खर्चात बचत होते.
फळबागेस सकाळी अथवा रात्री पाणी दिल्यास कार्यक्षम वापर होतो. पाण्याची कमतरता असलेल्या क्षेत्रात पिकांना एक आड एक सरीने पाणी द्यावे. तसेच पाणी देण्याच्या पाळीत (अंतरात) वाढ करावी. उदाहरणार्थ, एखाद्या बागेस १० दिवसांच्या अंतराने पाणी देत असाल तर पुढील पाणी १२ दिवसांनी, त्यापुढील पाणी १५ दिवसांनी अशा प्रकारे जमिनीचा मगदूर, तापमान, पाण्याची उपलब्धता लक्षात घ्यावी.
शेतकऱ्यांनो उत्पन्न वाढीचा आराखडा तयार करा
उन्हाळ्यात बाष्पीभवनामुळे जमिनीतून पाण्याचे अधिक उत्सर्जन होते आच्छादनाचा वापर केल्यामुळे बाष्पीभवनाचा वेग कमी करता येतो. जमिनीतील ओलावा टिकवून राहण्यास मदत होते.
आच्छादनाकरिता पालापाचोळा, वाळलेले गवत, लाकडी भुसा, उसाचे पाचट, गव्हाचे काड, भात तुसाचा वापर करावा, सेंद्रिय आच्छादनाची जाडी १२ ते १५ सें.मी असावी, सेंद्रिय स्वरूपाचे आच्छादन वापरल्यास पोत सुधारण्यास मदत होते.
आच्छादनासाठी पॉलिथिन फिल्मचा वापर मोठ्या प्रमाणात होऊ लागला आहे. आच्छादनामुळे सूर्यप्रकाश न मिळाल्यामुळे तणांची वाढ होत नाही, तसेच जमिनीचे तापमान नियंत्रित राहते. जमिनीत उपयुक्त जिवाणूंची वाढ होण्यास मदत होते.
सेंद्रिय पदार्थांचे आच्छादन असेल तर कालांतराने कुजून त्यापासून उत्कृष्ट सेंद्रिय खत मिळते. आच्छादनामुळे जमिनीची धूप कमी होते, तसेच जमिनीस भेगा पडण्याचे प्रमाण कमी होते. आच्छादनामुळे दिलेल्या खताचा जास्त कार्यक्षमरीत्या उपयोग करून घेता येतो, आच्छादन वापरण्यापूर्वी जमिनीवर कार्बारील भुकटी टाकून घ्यावी म्हणजे वाळवीचा प्रादुर्भाव होणार नाही.
आच्छादनाचा उपयोग केल्यास पावसाचा जमिनीवर पडण्याचा वेग मंदावतो जमिनीत जास्तीत जास्त पाणी मुरले जाते.
शेतकऱ्यांनो काळजी घ्या! बहुतांशी जिल्ह्यांत पावसासह गारपिटीची शक्यता
झाडाच्या दोन्ही बाजूंना ३ फूट लांबीचे बांबू रोवावेत. या बाबूंना चारही बाजूंनी व मधून तिरकस असे बांबू किंवा कामट्या बांध्याव्यात. त्यावर वाळलेले गवत अंथरावे. या गवतावरून तिरकस काड्या सुतळीने व्यवस्थित बांधाव्यात. वाळलेल्या गवताऐवजी बारदाना किंवा शेडनेटचा वापर करावा.
महत्वाच्या बातम्या;
पिकावरिल व्हायरस
मागणी येईल तिथं कांदा खरेदी करणार, शेतकऱ्यांना लवकरच मोठी मदत मिळणार, राज्य सरकारचा निर्णय
ज्वारीच्या भाकरीचे आहारातील महत्त्व; जाणून घ्या
Published on: 07 March 2023, 12:02 IST