शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. यामध्ये शासन आदेश धुडकावून पीक कर्जासाठी बँकांकडून 'सीबील'ची सक्ती केली जात आहे, त्यामुळे त्यांना कर्ज उपलब्ध होत नाही. यामुळे शेती करताना त्यांना अनेक अडचणी येतात.
यावर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, मुजोर बँकांना समज देऊन शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध करुन द्यावे, पीक हंगामासाठी शेतकऱ्यांना भांडवलाची आवश्यकता असते.
अनेक व्यापारी आणि राष्ट्रीयकृत बँका सिबिल स्कोअर 600 ते 700 पर्यंत असल्याशिवाय पीक कर्जाचे वितरण करत नाहीत. बँकांच्या या आडमुठ्या भूमिकेमुळे राज्यातील शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळण्यास अडचणी निर्माण होत असल्याची बाब मी हिवाळी अधिवेशनाच्यावेळी सभागृहात मांडली होती.
एकदा लावले की ४० वर्ष पैसाच पैसा!! बांबू शेती ठरतेय फायदेशीर..
असे असताना त्यावेळी शेतकऱ्यांना पीक कर्ज देताना ‘सीबील’ स्कोअरची सक्ती करणार नसल्याचा शब्द सरकारकडून सभागृहात देण्यात आला होता. मात्र त्या आदेशाला केराची टोपली दाखवली जात आहे.
Red Ladyfinger: शेतकऱ्यांनो एकदा लाल भेंडी लावाच, मोठ्या मागणीमुळे मिळतोय जास्तीचा भाव..
तसेच ‘सीबील’मुळे कोणत्याही शेतकऱ्याचे कर्ज मंजूर न केल्यास त्याबाबत तक्रार कोणाकडे करावी, याबाबत शेतकऱ्यांना अवगत करावे. तसेच कर्जाविषयीच्या तक्रारीचा निपटारा करण्यासाठी यंत्रणा उभारण्यात यावी, असेही अजित पवार म्हणाले.
महत्वाच्या बातम्या;
ममता जैन यांची कृषी जागरण समूहाच्या संपादक नियुक्ती...
विनाश पृथ्वीचा नाही, जीवसंस्कृतीचा होऊ शकतो
देशातील इथेनॉल क्षमता 25 टक्यांनी वाढणार, शेतकऱ्यांना होणार फायदा..
Published on: 17 January 2023, 10:41 IST