News

दिवसा शेतातील वीज मिळावी यासाठी गेल्या काही दिवसांपासून कोल्हापूर सांगलीमध्ये शेतकरी आंदोलन करत आहेत. माजी खासदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी हे या आंदोलनाचे नेतृत्व करत आहेत.

Updated on 28 February, 2022 2:10 PM IST

दिवसा शेतातील वीज मिळावी यासाठी गेल्या काही दिवसांपासून कोल्हापूर सांगलीमध्ये शेतकरी आंदोलन करत आहेत. माजी खासदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी हे या आंदोलनाचे नेतृत्व करत आहेत. ते अजूनही आंदोलन स्थळावरच आहेत. जोपर्यंत निर्णय होणार नाही, तोपर्यंत आपण जागेवरून हलणार नसल्याचे त्यांनी सांगितले आहे. असे असताना कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील शासकीय कार्यालयांमध्ये गेल्या काही दिवसांपासून जंगली प्राण्यांचा वावर वाढला आहे. यामध्ये साप मोठ्या प्रमाणावर दिसत आहेत. यामुळे याची चर्चा सुरु आहे.

शहरात असणाऱ्या या (Government Office) शासकीय कार्यालयांमध्ये अचानक (Snake) साप कसे असा प्रश्न अनेकांना पडला आहे. मात्र हे साप शेतकरीच सोडत असल्याचे सांगितले जात आहे. रात्रीची वीज दिली जात असल्याने शेतकऱ्यांना याचा त्रास होत आहे. यामध्ये साप चावल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. यामुळे अनेक शेतकऱ्यांचे जीव यामध्ये जात आहेत. तसेच अनेक प्राणी देखील शेतकऱ्यांवर हल्ला करत असतात. यासाठी शेतकरी आंदोलन करत आहेत.

यामुळे केवळ महावितरणच नाही तर तहसील, जिल्हाधिकारी कार्यालयातही हे जंगली प्राणी सोडले जात आहेत. राजू शेट्टी यांच्या आवाहनानंतर हा प्रकार सुरु झाला आहे. रात्रीच्या ऐवजी दिवसा वीजपुरवठा व्हावा अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची आहे. त्याच अनुशंगाने राजू शेट्टी यांचे आंदोलन सुरु केले आहे. यामुळे शेतकरी आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे. सध्या महावितरणकडून रात्रीच्या वेळी विद्युत पुरवठा केला जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

रात्रीच्या वेळी विंचू, साप यांचा वावर असल्याने शेतकऱ्यांच्या जिवितास धोका आहे. या मागणीकडे दुर्लक्ष होत असल्याने पाणी देताना आढळलेले जंगली प्राणी थेट शासकीय कार्यालयात सोडण्याचे आदेश त्यांनी शेतकऱ्यांना दिले आहेत. यामुळे हा घटना वाढल्याचे बोलले जात आहे. तसेच काल रात्री सांगली-इस्लामपूर रस्त्यावरील वीज वितरणचे कार्यालय पेटवून देण्यात आले आहे. तसेच इतर प्राणी कार्यालयात सोडण्यात येत आहेत.

शेतात काम करीत असताना असे साप आढळून आले की थेट शासकीय कार्यलयांमध्ये सोडले जात आहेत. त्यामुळे जंगली प्राण्यांचा वावर असताना आम्ही शेतीकामे करायची कशी हे यामधून दाखवून द्यायचे आहे. यामुळे आता तरी महावितरण याबाबत शेतकऱ्यांच्या बाजूने निर्णय घेणार का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. शेतकरी रात्री आपला जीव धोक्यात घालून शेतात काम करायाला जात आहे. यामुळे जोपर्यंत शेतात गेलेला व्यक्ती घरी येत तोपर्यंत घरातील व्यक्तीला काळजी लागत आहे.

English Summary: Farmers left snakes fields directly government offices, strange discussion state
Published on: 28 February 2022, 02:10 IST