News

शेतकरी खरीप हंगामाच्या तयारीला लागले आहेत. राज्यातील वेगवेगळ्या भागातील हवामान, जमिनीची प्रत, पर्जन्यमान यात फरक असल्यामुळे पिकांमध्येही वैविध्य आढळते. खरीप हंगामात प्रामुख्याने तांदुळ, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी आदी तृणधान्ये तर कडधान्यांमध्ये मुग, उडीद, तूर आदी तसेच तेलबियांमध्ये सोयाबिन, सुर्यफुल, तिळ, भुईमुग इ. तसेच कापूस या पिकांचे उत्पादन घेतले जाते.

Updated on 15 April, 2023 11:35 AM IST

शेतकरी खरीप हंगामाच्या तयारीला लागले आहेत. राज्यातील वेगवेगळ्या भागातील हवामान, जमिनीची प्रत, पर्जन्यमान यात फरक असल्यामुळे पिकांमध्येही वैविध्य आढळते. खरीप हंगामात प्रामुख्याने तांदुळ, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी आदी तृणधान्ये तर कडधान्यांमध्ये मुग, उडीद, तूर
आदी तसेच तेलबियांमध्ये सोयाबिन, सुर्यफुल, तिळ, भुईमुग इ. तसेच कापूस या पिकांचे उत्पादन घेतले जाते. पावसाच्या अनियमीतपणाचा या पिकांना अनेकदा फटका बसत असतो, यामुळेच खरीप पिकांची विशेष काळजी घ्यावी लागते.

महाराष्ट्रात सुमारे १४५ लाख हेक्टर जमीनीचे क्षेत्र खरीप लागवडीखाली येते. खरीप हंगाम पूर्णत: पावसावर अवलंबून असल्यामुळे शेतक-यांना खरीप हंगामाचे योग्य नियोजन करावे लागते. मात्र यासाठी काय नियोजन करायला हवे हे शेतक-यांनी लक्षात घेतले पाहिजे.

पाऊस पडेल या अपेक्षेने शेतकरी पिकांची लागवड करतात. मात्र ब-याचवेळा पाऊस वेळेवर येत नाही यामुळे शेतक-यांची तारांबळ उडते हे टाळण्यासाठी शेतक-यांनी कृषी व हवामान विभागांच्या सूचनांकडे वेळोवेळी लक्ष दिले पाहिजे. पिक लागवडीपूर्वी कृषी अधिका-यांचा सल्ला घेणे फायद्याचे ठरते.

अनेकदा पेरणीस लवकर सुरुवात करुन देखील पाऊस उशिरा आल्याने शेतक-याने बी बियाणांवर केलेला खर्च वाया जातो. यामुळे त्यांच्यावर दुबार पेरणीची वेळ येते, अशी परिस्थिती टाळण्यासाठी
हवामान खात्याच्या सुचनांकडे लक्ष देणे गरजेचे असते.

पीक विम्यापासून अजूनही शेतकरी वंचीत, शेतकरी संघटना आक्रमक..

अनेकदा अवर्षण प्रवण क्षेत्रामध्ये पावसाचा खंड अनुभवास मिळतो. हा खंड साधारणत: जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा अॉगस्ट महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात असतो. पाऊस वेळेवर सुरु झाला तर १५ जुलै पर्यंत खरीप हंगामातील पिके चांगली येतात.

नंतर पडणा-या पावसाच्या लहरीपणामुळे मात्र पिकाची वाढ खुंटते आणि परिणामी उत्पादनात घट होते. यामुळे खरीप हंगामात अंतर पिके घेण्यावर भर दिला पाहिजे. यामध्ये २:१ किंवा २:२ ही अंतरपिक पद्धती योग्य ठरते. यासाठी हलक्या जमीनीतील पिकांवर युरियाची फवारणी करावी.

तेलबियांची पिके असतील तर विरळणी केलेली अधिक फायदशीर ठरते. आंतरपिकांमध्ये झाडांची संख्या हेक्टरी तीस हजारापर्यंत कमी करावी तसेच पिकांची कोळपणी करुन घ्यावी.

भारतीय शेतीमध्ये सौर उर्जेवर चालणाऱ्या ट्रॅक्टरचे फायदे

शेतकरी पाऊस पडण्याच्या आशेने वेळेवर पेरण्या पूर्ण करतात. पण, पावसाने ओढ दिल्याने पेरण्या वाया जाण्याची शक्यता निर्माण होते. पावसाने ताण दिला तर दुबार पेरणीचे संकट निर्माण होते. अनेकदा बी-बियाणांचा तसेच मशागतीसाठी केलेला खर्च वाया जातो. परिणामी, खतांसाठी पुन्हा खर्च करण्याची वेळ येते.

त्यामुळे शेतक-यांना आर्थिक नुकसान सोसावे लागते. हे नुकसान टाळण्यासाठी पाऊस पडल्याशिवाय पेरण्या न करणे योग्य असल्याचे मत कृषीतज्ज्ञ नोंदवतात. असे केल्याने पाऊस लांबला तरी पीक वाया जात नाही. या कालावधीत पाणी उपलब्ध असलेल्या ठिकाणी भाजीपाल्याची लागवड करता येते. त्यातूनही जर पेरणी केली असेल तर पिकांना सरीने पाणी देणे सोपे जाते. तसेच पाणी दिल्यावर स-यांमध्ये पालापाचोळा टाकल्यामुळे पाण्याचे बाष्पीभवन होत नाही.

शेतकऱ्यांनो शेत जमीन जाळू नका, जाणून घ्या..
अजून तीन दिवस पाऊस, गारपिटीचा शक्यता, 'या' ठिकाणी होणार पाऊस, जाणून घ्या..
धक्कादायक! बैलगाडा शर्यतीसाठी गेलेल्या युवकाच्या पोटात बैलाने खुपसले शिंग, तरुणाचा जागीच मृत्यू..

English Summary: Farmers know how to plan Kharipa...
Published on: 15 April 2023, 11:35 IST