महाराष्ट्रात महाविकास आघाडी ची सत्ता स्थापन होताच कर्जमाफी ची घोषणा केली होती जे की अजूनही त्याची अंमलबजावणी सुरू आहे. वर्धा जिल्ह्यातील जवळपास ५३ हजार पेक्षा जास्तच शेतकऱ्यांना या कर्जमाफी चा लाभ देखील झालेला आहे. राज्य सरकारने महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्त योजना ही शेतकऱ्यांच्या डोक्यावरील कर्जाचा भार कमी व्हावा यासाठी काढलेली होती जे की या योजनेचा शेतकऱ्यांना फायदा देखील झालेला आहे. मात्र जे शेतकरी नियमितपणे कर्जाची रक्कम भरतात त्या शेतकऱ्यांना अजूनही या योजनेचा लाभ झालेला नाही. अगदी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घोषणा करून सुद्धा अजूनही राज्यात अंमलबजावणी झालेली नाही.
नियम व अटींचे पालन करणाऱ्यांना माफी :-
वर्धा जिल्ह्यामधे सर्व नियम आणि अटी पाळून जे शेतकरी या योजनेसाठी पात्र आहेत त्या शेतकऱ्यांची ऑनलाईन पध्दतीने नवे अपलोड करण्याचा सूचना बँकांना दिलेल्या होत्या. वर्धा जिल्यातील जवळपास ५४ हजार ७९३ खातेदार शेतकऱ्यांच्या आधार प्रमाणिकरणसाठी पोर्टल सुद्धा उपलब्ध झालेले आहे. जे की ५४ हजार ७९३ खातेदार शेतकऱ्यांपैकी ५३ हजार २१२ खातेदार शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण होऊन त्यांना या कर्जमाफीचा लाभ देखील झालेला आहे. कर्जाची रक्कम ही ४७० कोटी रुपये असून ती शासनाने शेतकऱ्यांच्या खात्यामधे सुद्धा रक्कम जमा केलेली आहे. आता फक्त १ हजार १२२ शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण शिल्लक असून सध्या त्याच्या प्रमाणिकरणाची कारवाई सुरू आहे.
८ हजार शेतकऱ्यांना व्याज सवलत :-
ग्रामीण व खाजगी बँकेकडून जे लोक कर्ज घेतात आणि दिलेल्या मुदतीमध्ये आपण कर्जाची रक्कम फेडली की शासन त्या कर्जावर व्याज सवलत देत असते. वर्धा जिल्ह्यामध्ये सण २०२१ - २०२२ या आर्थिक वर्षात जवळपास ८ हजार शेतकऱ्यांनी मुदतीमध्ये कर्जाची फेड केलेली आहे जे की त्यांना १ कोटी ८५ लाख रुपयांची कर्ज सवलत भेटलेली आहे. त्यामुळे त्या लोकांना या योजनेचा लाभ घेता आला.
लाभासाठी आधार प्रमाणिकरणाचे मोहीम :-
शासनाने जी योजना सुरू केली याचा लाभ सर्व पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांना भेटवा आणि त्यांना दिलासा मिळाला हा उद्देश आहे.जे की उरलेले जे लाभार्थी आहेत त्यांचे सध्या आधार प्रमाणीकरण चालू असून त्यांना सुद्धा या योजनेमध्ये समाविष्ट केले आहे. वर्धा जिल्ह्यामध्ये या योजनेचे १०० टक्के काम व्हावे असे निर्देश देखील देण्यात आले आहेत.
Published on: 19 May 2022, 04:19 IST