News

नाशिक जिल्हा म्हणजे कांद्याचे माहेरघर, मात्र मागील काही दिवसांपासून बाजारात कांद्याच्या दराची घसरण होत चालली आहे. मागील काही दिवसांपूर्वी कांद्याचे दर जवळपास ५०० रुपयांनी घसरले तर दुसऱ्या बाजूला शेतकऱ्यांनी साठवलेल्या उन्हाळी कांद्याचे दर वर चढतील या अपेक्षेत राहून ते खराब होत चालले आहेत त्यामुळे शेतकरी वर्ग चिंतेत राहिलेला आहे.एका बाजूला घसरत चाललेले दर आणि दुसऱ्या बाजूला खराब होत चाललेले कांदा त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक बजेट कोसळत निघाले आहे.

Updated on 10 September, 2021 9:06 PM IST

नाशिक जिल्हा म्हणजे कांद्याचे माहेरघर, मात्र मागील काही दिवसांपासून बाजारात कांद्याच्या दराची घसरण होत चालली आहे. मागील काही दिवसांपूर्वी कांद्याचे दर जवळपास ५०० रुपयांनी घसरले तर दुसऱ्या बाजूला शेतकऱ्यांनी साठवलेल्या उन्हाळी कांद्याचे दर वर चढतील या अपेक्षेत राहून ते खराब होत चालले आहेत त्यामुळे शेतकरी वर्ग चिंतेत राहिलेला आहे.एका बाजूला घसरत चाललेले दर आणि दुसऱ्या बाजूला खराब होत चाललेले कांदा त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक बजेट कोसळत निघाले आहे.

उन्हाळा कांद्याच्या दरात घसरण:

मागील वर्षी कांद्याची रोपे खराब झाल्यामुळे बियानाचे दर तिप्पट दराने वाढले गेले त्यामुळे कांदा(onion) उत्पादक शेतकऱ्यांना जिल्ह्यातुन जास्त दराने बियाने आणावे लागले आणि त्यामध्ये सुद्धा शेतकऱ्यांची फसवणुक झालेली आहे. जसे की काही ठिकाणी कांदा (onion) जमिनीत असतानाच सडून गेला तर काही ठिकाणी रांगडा निवडणे आणि डोंगळे निवडणे असा सुद्धा प्रकार घडलेला आहे. या फसवणुकीमुळे शेतकरी अजून अडचणीत आलेला आहे नक्की नैसर्गिक संकटाला सामोरे जावे की या फसवणुकीला तेच समजणे बाहेर गेले आहे.

हेही वाचा:मोदी सरकारचा धमाकेदार निर्णय, गहू पिकाच्या हमीभावात ४० रुपये तर हरभरा च्या हमीभावात १३० रुपयांनी वाढ

कांदा साठवावा की नाही:

कांद्याला डोंगळे आल्यामुळे यावेळी कांदा साठवायचे का नाही अशी कठिक परिस्थिती शेतकऱ्यांनपुढे उभे राहिलेले आहे. डोंगळे आलेला कांदा पाणी नसल्याने करपून निघालेला आहे. इकडे कांद्याचा भाव(rate) घसरत निघालेला आहे आणि दुसऱ्या बाजूला कांदा पिकाला डोंगळे आल्याने कांदा सडतच चाललेला  आहे  त्यामुळे  शेतकरी  वर्ग अडचणीत सापडलेला आहे. मागील काही दिवसात कांद्याचे दर ५०० रुपयाने कोसळले आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान(loss) झेलावे लागत आहे. अत्ता जो साठवलेला कांदा आहे तो आहे या दरात विकावा की दर वाढीची अजून प्रतीक्षा करावी असा प्रश्न शेतकऱ्यांना पडलेला आहे.चिंचोडे बुद्रुक मधील शेतकरी अभिजित राजगुरू यांनी असे सांगितले की दिवसरात्र कष्ट  करून  उन्हाळी कांदा  साठवला आहे आणि त्याच्या दरात वाढ व्हावी म्हणून आम्ही प्रतीक्षा करत बसलो मात्र कांद्याचे दर कमीच होत निघाले आहेत यामधून गेलेला खर्च  निघेल  की  नाही  आणि  त्यात कांदा  खराब  होत चाललेला आहे.

सध्याची अत्ता अशी परिस्थिती आहे कांदा उकिरड्यावर फेकण्याची वेळ  आलेली  आहे  त्यामुळे सरकारने  लवकरात  लवकर  कांद्याला  किमान  दोन  हजार  रुपये  द्यावा  अशी मागणी    आहे.सरकारच्या चुकीच्या निर्यात धोरणामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना नेहमी आर्थिक नुकसान सोसावे लागते. सध्या पाहायला  गेले  तर  कांद्याचा  दर   प्रति  किलो  १२  ते १३ रुपयांनी कोसळलेला आहे त्यामुळे अत्ता गेलेला खर्च तरी माघारी निघतोय की नाही अशी परिस्थिती शेतकऱ्यांवर आलेली आहे.

English Summary: Farmers in trouble, big fall in summer onion prices
Published on: 10 September 2021, 09:06 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)