News

गरिबापासून ते श्रीमंतापर्यंत सर्वत्र तूरडाळीचा वापर होतो. तूर हे प्रामुख्याने आफ्रिकेतील पीक आहे असे सांगितले जाते,

Updated on 01 December, 2021 7:30 PM IST

मात्र शेतकरी जे उत्तम उत्पन्न घेतात त्यावरून ते भारतीय पीक असल्याचे काही जणांचे म्हणणे आहे. तुर हे पीक प्रामुख्याने खरीप हंगामात घेतले जाते.

 बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा या तालुक्यामध्ये पांगरी उगले या गावातली विठ्ठल गिरी या शेतकऱ्याची १० एकर जमीन आहे.

गेल्या १५ वर्षांपासून ते सोयाबिन आणि कापूस चे उत्पन्न घेणारे प्रगतशील शेतकरी म्हणून त्यांचा नावलौकिक होता.

काही कारणास्तव त्यांनी या वर्षी त्यांनी कापूस व सोयाबिन चे क्षेत्र कमी केले . व १७ जून रोजी त्यांनी २ एकर क्षेत्रावर सीता ९५ हे तुरीचे वाण टोकण पद्धतीने लावले व ठिबकने पाणी ते देत आहेत. दोन ओळींतील अंतर साडेआठ फूट व दोन रोपांतील अंतर दोन फूट ठेवले.

माती व जमीन चांगल्या दर्जाची नसल्याने दररोज अर्धा ते एक तास ठिबकने पाणी दिले.

त्यानंतर या वर्षी मोठय़ा प्रमाणावर पाऊस झाला, त्यामुळे पीक जोमात आले. मात्र फलधारण उशिरा झाली. माञ फुलगळही कमी झाली व

तुरीचे उत्पादन नोव्हेंबर महिन्यात अपेक्षित होते ते आता डिसेंबरअखेर येईल. तुरीला लागणारी सर्व खते ठिबकमधून देण्यात आली. आतापर्यंत फक्त दोन फवारण्या करण्यात आल्या आहेत. तुरीची उंची दहा ते बारा फूट असून साधारणपणे एका झाडापासून एक ते दोन किलो उत्पादन होईल, असा गीरी यांचा अंदाज आहे.

कारण एका शेंगामध्ये पाच ते सहा आहेत , एका एकरामध्ये २ हजार तुरीची झाडे असतात. त्यांच्या अंदाजाप्रमाणे उत्पादन मिळाल्यास एकरी ३० क्विंटल उत्पादन होईल. अंदाज थोडा चुकला तरी २५ क्विंटल एकरी किमान उत्पादन त्यांनी गृहीत धरले आहे. 

प्रतिनिधी - गोपाल उगले

MO- 9503537577

English Summary: Farmers in Pangri Ugale are taking record yield of turi.
Published on: 01 December 2021, 07:30 IST