News

मराठवाड्यातील खरीप हंगाम पावसाअभावी धोक्यात आला आहे. सध्या लागण केलेल्या पिकांना पाण्याची गरज आहे. आणि त्यातच पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे शेतकरी वर्गाची अधिक चिंता वाढली आहे.

Updated on 01 September, 2023 11:56 AM IST

पुणे

राज्यात सध्या सर्वत्र पावसाने दडी दिली आहे. त्यामुळे शेतकरी वर्गाची चिंता वाढली आहे. मराठवाड्यातील शेतकऱ्यांना अद्यापही जोरदार पावसाची प्रतिक्षा आहे. तर पाऊस कमी झाल्यामुळे मराठवाड्यात खरीपाच उत्पादन ३५ ते ४० घटण्याची शक्यता आहे.

मराठवाड्यातील खरीप हंगाम पावसाअभावी धोक्यात आला आहे. सध्या लागण केलेल्या पिकांना पाण्याची गरज आहे. आणि त्यातच पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे शेतकरी वर्गाची अधिक चिंता वाढली आहे.

छत्रपती संभाजीनगरसह मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या नजरा आता पावसाकडे लागल्या आहेत. मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर खरीपाच्या पिकांची पेरणी केली आहे. बऱ्यापैकी क्षेत्र हे पावसावर अवलंबून आहे. 

दरम्यान, हवामान खात्याने राज्यात पुन्हा पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात हवामान खात्याचा अंदाज बरोबर येतो का हे पाहणं आता महत्त्वाच आहे.

English Summary: Farmers in Marathwada are worried Kharif crops in danger due to lack of rain
Published on: 18 August 2023, 10:30 IST