News

दोन दिवसांपूर्वी राज्य सरकारने एक मोठा निर्णय घेतला, यामुळे काहींनी याचे स्वागत केले तर काहींनी यावर टीका केली. राज्य सरकारने वाईन विक्रीतून मिळणारा महसूल वाढविण्याच्या दृष्टीकोनातून हा मोठा निर्णय घेतला आहे. आता राज्यातील किराणा दुकान आणि सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे.

Updated on 29 January, 2022 7:30 PM IST

दोन दिवसांपूर्वी राज्य सरकारने एक मोठा निर्णय घेतला, यामुळे काहींनी याचे स्वागत केले तर काहींनी यावर टीका केली. राज्य सरकारने वाईन विक्रीतून मिळणारा महसूल वाढविण्याच्या दृष्टीकोनातून हा मोठा निर्णय घेतला आहे. आता राज्यातील किराणा दुकान आणि सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. वाईन विक्रीच्या नव्या प्रस्तावाला राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी मिळाली आहे. विरोधक या निर्णयावर टीका करत असताना राज्य सरकारकडून या निर्णयाचे स्वागत केले जात आहे. आता शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी विरोधकांना प्रत्युत्तर दिले आहे. यावेळी बोलताना त्यांनी भाजपचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे वेगळे असल्याचे म्हटले आहे.

यामुळे या निर्णयावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. संजय राऊत म्हणाली की, राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनाला भाव मिळेल. त्यांची आर्थिक स्थिती सुधारेल. वाईनला विरोध करणाऱ्यांनी शेतकऱ्यांचे आर्थिक गणितही समजून घ्यावे. भाजपाचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे वेगळे आहेत, असे त्यांनी म्हटले आहे. या निर्णयावर अनेकांनी वेगवेळ्या प्रतिक्रिया दिल्या आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, वाईन आणि दारू त्याच्यामध्ये जमीन-अस्मानचा फरक आहे. आपल्या राज्यातले अनेक शेतकरी वेगवेगळ्या प्रकारची फळे तयार करतात. द्राक्षातून, काजूतून वाईन तयार केली जाते.

आपल्याकडे जेवढी वाईन तयार होते तेवढी वाईन खपत नाही. आजूबाजूच्या राज्यात त्याची विक्री केली जाते. काही परदेशात एक्सपोर्ट केली जाते. काही देशात पाण्याऐवजी वाइन्स पितात हे सर्वांनाच ठाऊक आहे. परंतु काही जाणीवपूर्वक त्याला मद्यराष्ट्र म्हणत वेगळेच महत्त्व दिले, असे अजित पवार यांनी सांगितले. तसेच असा निर्णय घेणाऱ्या सरकारविरोधात सर्व संघटनांनी आता लढा उभारला पाहिजे. यासाठी मंत्रिमंडळाशी बोलून हा निर्णय मागे घेण्यासाठी पाठपुरावा करणार आहे. अन्यथा राज्यपालांची भेट घेऊन राज्य सरकार बरखास्त करण्याची मागणी करणार असल्याचे शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी म्हटले आहे.

वाईनला परवानगी देण्याचा निर्णय हा संतापजनक असल्याचे त्यांनी म्हंटले आहे. ‘सरकारने वाइन सुरू करून जुगार लावलेला आहे. मला आर आर आबांची आठवण होते. आज ते असते तर हा वाईनचा निर्णय झाला नसता. तसेच सगळ्यांच्या विरोधात जाऊन त्यांनी डान्सबार बंदी करण्याचा निर्णय घेतला होता असेही भिडे म्हणाले. यामुळे येणाऱ्या काळात यावरून राजकीय वातावरण चांगलेच तापण्याची शक्यता आहे.

English Summary: 'Farmers go into debt by planting wineries, if there is scope for sale of wine, prices of farmers' produce will go up'
Published on: 29 January 2022, 03:18 IST