News

कोरोना व्हायरसमुळे (covid-19) देशात लॉकडाऊन चालू आहे. यामुळे शेतकऱ्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. शेतकऱ्यांच्या या समस्य़ांची दक्षता घेत सरकारने पंतप्रधान विमा योजनेच्या(PMFBY) अंतर्गत १ हजार कोटी रुपये दिले आहेत. हा निधी केंद्र सरकारकडून विविध राज्यांच्या आणि केंद्रशासित राज्यांच्या शेतकऱ्यांना देण्यात आला आहे.

Updated on 08 April, 2020 4:19 PM IST

कोरोना व्हायरसमुळे (covid-19) देशात लॉकडाऊन चालू आहे.  यामुळे शेतकऱ्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.  शेतकऱ्यांच्या या समस्य़ांची दक्षता घेत सरकारने पंतप्रधान विमा योजनेच्या(PMFBY) अंतर्गत १ हजार कोटी रुपये दिले आहेत.  हा निधी केंद्र सरकारकडून विविध राज्यांच्या आणि केंद्रशासित राज्यांच्या शेतकऱ्यांना देण्यात आला आहे.

कोणकोणत्या राज्यांना मिळेल लाभ
केंद्रीय कृषी आणि किसान कल्याण मंत्रालयानुसार, छत्तीसगड,४६४.२४ कोटी रुपये, हरियाणामध्ये २६.०८ कोटी, जम्मू-काश्मीरमध्ये १४.७१ कोटी रुपये, राजस्थानला ३२७.६७ कोटी रुपये. कर्नाटकात ७५.७६ कोटी रुपये, मध्यप्रदेशसाठी १७०९० कोटी, तर महाराष्ट्रासाठी २१.०६ कोटी, तमिळनाडू २१.१७ कोटी, उत्तरप्रदेश ४१.०८ कोटी रुपये आणि तेलंगाणासाठी ०.३१ कोटी रुपये देण्यात आले आहेत. या लॉकडाऊनच्या काळातच पंतप्रधान पीक विमा योजनेतून करण्यात आलेल्या घोषणेतून हा निधी देण्य़ात आला आहे.  दरम्यान या लॉकडाऊनच्या काळात देशातील ४ कोटी शेतकऱ्यांना केंद्र सरकारने दिलासा दिला आहे. पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेनुसार ४.९१ कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दोन -दोन हजार रुपये टाकण्यात आले आहेत. या योजनेच्या अंतर्गत आतापर्यंत ६२ कोटी रुपये देण्यात आले आहेत.

English Summary: farmers get prime minister crop insurance money with pm kisan scheme
Published on: 08 April 2020, 04:09 IST