News

पुणे जिल्ह्यातील इंदापूर (Indapur) तालुक्यातील कळसच्या गोसावीवाडीतील शेतकरी मधुकर खर्चे यांच्या उसाची पाहणी करण्यासाठी माजी केंद्रीय मंत्री शरद पवार येथे आले होते. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला.

Updated on 02 January, 2023 2:18 PM IST

पुणे जिल्ह्यातील इंदापूर (Indapur) तालुक्यातील कळसच्या गोसावीवाडीतील शेतकरी मधुकर खर्चे यांच्या उसाची पाहणी करण्यासाठी माजी केंद्रीय मंत्री शरद पवार येथे आले होते. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला.

मधुकर खर्चे एकरात शंभर टन आणि ५० ते ६० कांडी असलेल्या उसाचे उत्पादन घेत आहेत. त्या उसाची पाहणी त्यांनी करत त्यांचे कौतुक देखील केले. त्यांनी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटला थेट कार्यक्रमातून मोबाईलद्वारे संपर्क केला.

तसेच खर्चे यांच्या उसाची पाहणी करून माहिती घेण्याची सूचना केली. यावेळी मोठ्या प्रमाणावर शेतकरी उपस्थित होते. शेतकरी विविध प्रयोगांतून शेतात वाढीव उत्पन्न घेत आहे.

फुले ११०८२! ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी फायदेशीर जात...

तसेच शरद पवार म्हणाले, शेतकरी चांगल्या उत्पादन घेऊन हीच माहिती ते आनंदात पत्रकारांना देतात. पत्रकारांनी बातमी दिल्यानंतर सरकार म्हणते, शेतकऱ्यांना आता जास्तीचे उत्पन्न मिळत आहे. त्यांच्यावर कर बसवा, यामुळे त्यांचे नुकसान होते.

कोरोना जवळ आला असताना डॉक्टर संपावर, आरोग्य यंत्रणा कोलमडण्याची शक्यता

यामुळे ते म्हणाले, माझा तुम्हाला सल्ला असेल, उत्पन्न मिळवा, पण पत्रकारांना माहिती देताना उत्पन्न सांगू नका, असेही ते म्हणाले. यावेळी त्यांनी द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची भेट देखील त्यांनी घेतली.

महत्वाच्या बातम्या;
३६० ट्रॅक्टर, ७० पोकलेन आणि डझनभर जेसीबी, फडतरीची झाली एक वेगळीच ओळख
मोलॅसिस विक्रीची रक्कम शेतकऱ्यांना द्या, प्रत्येक उपपदार्थांच्या विक्रीचा नफा शेतकऱ्यांना मिळणार, सरकारचा मोठा निर्णय, शेतकऱ्यांना दिलासा
दारू मटण सोडून जळगावात नववर्षाच्या स्वागताला गोमूत्र प्राशनाची अनोखी पार्टी

English Summary: Farmers, get income, don't tell journalists Sharad Pawar's advice
Published on: 02 January 2023, 02:18 IST