News

आपल्या देशात अनेक कुटुंब आजही शेतीवर अवलंबून आहेत, अनेकांचा पारंपरिक व्यावसायच शेती आहे. तसेच देशाच्या अर्थव्यवस्थेत देखील शेतीचा मोठा वाटा आहे. असे असताना देखील शेतकरी आत्महत्या करतो. अनेक शेतकरी कर्जबाजारी होत आहेत. असे असताना अनेक शेतकरी बाजारभावाचा अभ्यास करून चांगली शेती करून चांगले उत्पन्न कमवतात.

Updated on 19 January, 2022 10:49 AM IST

आपल्या देशात अनेक कुटुंब आजही शेतीवर अवलंबून आहेत, अनेकांचा पारंपरिक व्यावसायच शेती आहे. तसेच देशाच्या अर्थव्यवस्थेत देखील शेतीचा मोठा वाटा आहे. असे असताना देखील शेतकरी आत्महत्या करतो. अनेक शेतकरी कर्जबाजारी होत आहेत. असे असताना अनेक शेतकरी बाजारभावाचा अभ्यास करून चांगली शेती करून चांगले उत्पन्न कमवतात. अलीकडच्या काळात लसूण शेतीमधून मोठे उत्पन्न अनेक शेतकरी घेत आहेत. यामुळे यामधून देखील आपल्याला चांगले उत्पन्न मिळू शकते. यामुळे शेतकऱ्यांनी याचे योग्य व्यवस्थापन केले तर नक्कीच फायदा होऊ शकतो.

लसणाची लागवड करून शेतकरी अल्पावधीत लाखो रुपये कमवू शकतो. एका पिकातून तुम्ही 10 लाख रुपयांपर्यंत नफा मिळवू शकता. मात्र यासाठी तुम्हाला अनेक महत्त्वाच्या गोष्टींकडे लक्ष द्यावे लागेल. लसणाच्या अनेक जाती आहेत. यामध्ये योग्य तीच लागवड करणे गरजेचे आहे. यामध्ये तुम्ही सुरुवातीला मातीची चाचणी करून घ्या आणि तुमच्या जागेवर लसणाची कोणती लागवड केल्यास चांगले उत्पादन मिळेल हे कृषी तज्ज्ञांकडून जाणून घ्या. अनेकदा आपल्या जमिनीवर अनेक गोष्टी अवलंबून असतात. यामुळे याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.

साधारण नोव्हेंबरपासून याची लागवड करावी, पाऊस थांबल्यानंतरचा काळ यासाठी फायदेशीर ठरतो. कळ्यापासून त्याची लागवड केली जाते. लसणाची लागवड कोणत्याही शेतात करता येते, फक्त लक्षात ठेवा की शेतात पाणी साचू नये. त्याचबरोबर बांध बांधून त्याची लागवड केली जाते. तसेच सरीतील अंतर देखील जास्त असावे, जेणेकरून त्यामध्ये पाणी साचू नये. 10 सेमी अंतरावर लसणाची लागवड करावी, यामुळे त्याची योग्य अशी वाढ होण्यास मदत होते. एक हेक्टर जमिनीत सरासरी ५ क्विंटल लसणाच्या कळ्या लावता येतात. त्यामुळे 130 ते 150 क्विंटलपर्यंत उत्पादन मिळेल. योग्य नियोजन असेल तर यामध्ये वाढ देखील होत असते.

लसणाच्या एका हेक्टरसाठी 1 ते 1.25 लाख रुपये खर्च होतील. सरासरी, एक हेक्टरमधून तुम्हाला अनेक क्विंटल लसणाचे उत्पादन मिळेल. जर बिया चांगल्या असतील तर हे खूप असू शकते. किंमत चांगली असेल तर तुमचा नफा लाखात असू शकतो. याची साठवणूक देखील करता येते, यामुळे बाजारभाव कमी असेल तर तुम्ही काही दिवस याची विक्री थांबवू शकता, यामुळे यामधून तुम्ही चांगले पैसे कमवू शकता. अनेक शेतकरी फक्त घरगुती वापरासाठी लसणाची लागवड करतात, यामुळे अनेकदा याचे दर मोठ्या प्रमाणावर वाढत असतात, यामुळे यामधून चांगले पैसे मिळतात.

English Summary: Farmers garlic, you will get lakhs of rupees from one crop in this way, read in detail
Published on: 19 January 2022, 10:49 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)